
मुंबईः आर्थिक वर्ष संपताच महाराष्ट्र सरकारने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी रेडीरेकनर दरात मोठी वाढ केली आहे. हे नवे रेडीरेकनर दर १ एप्रिलपासून लागू होतील. मुंबई वगळता महानगरपालिका क्षेत्रातील रेडीरेकनर दरात ५.९५ टक्के तर ग्रामीण भागातील रेडीरेकनर दरात ३.३६ टक्के वाढ करण्यात आली आहे. रेडीरेकनर दरातील या वाढीचा फटका मालमत्ता खरेदी करणाऱ्यांना बसणार आहे.
राज्य सरकारने नगर परिषद आणि नगर पंचायत क्षेत्रात ४.९७ टक्के, प्रभाव क्षेत्रात ३.२९ टक्के तर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सरासरी ३.३९ टक्के इतके रेडीरेकनर दर वाढवले आहेत. रेडीरेकन दरात केलेली राज्यातील ही वाढ (मुंबई वगळता) सरासरी ४.९३ टक्के आहे. तर राज्यातील एकूण रेडीरेकन दरातील वाढ ३.८९ टक्के आहे.
राज्य सरकारने सन २०१७-१८ मध्ये रेडीरेकनर दर निर्धारित केले होते. त्यानंतर सन २०१८-१९ आणि २०१९-२० मध्ये मालमत्ता क्षेत्रातील मंदीचा विचार करून या रेडीरेकनर दरात कोणतीही वाढ न करता २०१७-१८ मध्ये निर्धारित केलेले रेडीरेकनर दरच कायम ठेवण्यात आले होते.
देशात आलेल्या कोरोनाच्या संकटाचा विचार करून रेडीरेकनर दरात कमी प्रमाणात वाढ करण्यात आली होती. मात्र २०२२-२३ मध्ये रेडीरेकन दर वाढवण्यात आले होते. यावर्षी निर्धारित केलेले रेडीरेकनर दरच २०२४-२५ साठी कायम ठेवण्यात आले होते. आता दोन वर्षांनी रेडीरेकनर दरात वाढ करण्यात आली आहे.
तुमच्या शहरातील रेडीरेकनर दर किती?
महानगर पालिका क्षेत्र | सरासरी वाढ | महानगर पालिका क्षेत्र | सरासरी वाढ |
ठाणे | ७.७२ % | पनवेल | ४.९७ % |
मीरा- भाईंदर | ६.२६ % | पुणे | ४.१६ % |
कल्याण-डोंबिवली | ५.८४ % | पिंपरी-चिंचवड | ६.६९ % |
नवी मुंबई | ६.७५ % | कोल्हापूर | ५.०१ % |
उल्हासनगर | ९.०० % | इचलकरंजी | ४.४६ % |
भिवंडी-निजामपूर | २.५० % | सोलापूर | १०.१७ % |
वसई-विरार | ४.५० % | नाशिक | ७.३१ % |
मालेगाव | ४.४८ % | धुळे | ५.०७ % |
जळगाव | ५.८१ % | अहिल्यानगर | ५.४१ % |
छत्रपती संभाजीनगर | ३.५३ % | नांदेड-वाघाळा | ३.१८ % |
लातूर | ४.०१ % | परभणी | ३.७१ % |
जालना | ४.०१ % | नागपूर+NMRDA | ४.२३ %+ ६.६०% |
चंद्रपूर + म्हाडा | २.२०% + ७.३०% | अमरावती | ८.०३ % |
अकोला | ७.३९ % | मनपा क्षेत्रातील वाढ | ५.९५ % |