खुश खबर! आता बँक खात्यात पैसे नसले तरी करता येणार फोनपे, गुगलपेसारख्या यूपीआयद्वारे पेमेंट


मुंबईः  तुमच्या बँक खात्यात पैसे असतील तरच तुम्हाला आजवर फोनपे, गुगलपेसारख्या यूपीआयद्वारे पेमेंट करता येत होते. आता मात्र ग्राहकांना बँक खात्यात पैसे नसले तरीही अशा यूपीआयद्वारे पेमेंट करता येणार आहे. डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने (आरबीआय)  क्रेडिट कार्डप्रमाणेच यूपीआय पेमेंटसाठीही प्री-सेक्शन क्रेडिट लाईन ऑपरेट करण्याची घोषणा केली आहे.

 रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक नुकतीच झाली. या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. यूपीआयने भारतातील पेमेंटची पद्धतच बदलली आहे. दररोज कोट्यवधी रुपयांचे व्यवहार यूपीआयद्वारे केले जाऊ लागले आहेत. यूपीआयद्वारे कोणतेही व्यवहार करताना तुमच्या बँक खात्यात तेवढी रक्कम असणे आवश्यक होते. परंतु आता रिझर्व्ह बँकेने आणलेल्या नवीन प्रस्तावामुळे तुमच्या बँक खात्यात पुरेशी रक्कम नसली तरीही तुम्हाला पेमेंट करता येऊ शकणार आहे.या नवीन प्रस्तावामुळे नावीन्यपूर्णतेला प्रोत्साहन मिळेल.

आतापर्यंत यूपीआय ऍप तुमच्या बँक खात्याशी लिंक करून तुम्हाला पेमेंट करता येत होते. पेमेंट ऍपचे वॅलेट किंवा तुमचे बँक खाते या दोन्हीपैकी एकात पुरेशी रक्कम असेल तरच पेमेंट करता येणे शक्य होते. रिझर्व्ह बँकेने आता यूपीआय यूजर्सला प्री-सेक्शन क्रेडिट लाईन म्हणजेच पूर्वमंजुरी उधारी देण्याचा निर्णय घेतला आहे.

रिझर्व्ह बँकेच्या या नवीन प्रस्तावामुळे लोकांना क्रेडिट कार्डची संख्या कमी करून यूपीआयद्वारे व्यवहार करण्याची संधी मिळेल. यूपीआयद्वारे ग्राहक बँकेच्या क्रेडिट लाईनचा वापर करू शकतील.

कशी मिळेल क्रेडिट लाईन?

प्रत्येक यूपीआय यूजर्सची क्रेडिट लाईन वेगवेगळी असेल. यूपीआय क्रेडिट मिळण्यासाठी बँका आणि पेमेंट ऍप्स ग्राहकाचे उत्पन्न, कर्ज परतफेड करण्याची क्षमता इत्यादी बाबींचा आढावा घेऊनच प्रत्येक ग्राहकाची क्रेडिट लाईन ठरवतील. या नवीन योजनेमुळे यूपीआयवर ओव्हरड्राफ्ट किंवा क्रेडिट कार्डसारखी सुविधा उपलब्ध होईल.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!