पुणे-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करणार, पुणे- शिरूरदरम्यानचा रस्ता होणार सहा पदरी


मुंबईः सध्याच्या पुणे-शिरुर-अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करण्याचा निर्णय गुरूवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

पुणे ते शिरुर हा ५३ कि.मी. चा मार्ग सहा पदरी उन्नत करण्यात येणार असून एमएसआयडीसीमार्फत हे काम केले जाईल. यासाठी ७ हजार ५१५ कोटी खर्च अपेक्षित आहे. शिरुर-अहमदनगर बाह्यवळण रस्ता मार्गे छत्रपती संभाजीनगर हा सध्याचा रस्ता सुधारण्यासाठी २ हजार ५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

शिरुर ते अहमदनगर या मार्गामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पथकर वसुली होत आहे. त्यामुळे ही पथकर वसुली संपल्यानंतर हा मार्ग हस्तांतरित करण्यात येईल. अहमदनगर ते देवगड हा रस्ता सुधारण्यासाठी तो एमएसआयडीसीला हस्तांतरित करण्यात येईल.

देवगड ते छत्रपती संभाजीनगर या मार्गांवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पथकर वसुली होत आहे. ती संपुष्टात आल्यानंतर हा मार्ग एमएसआयडीसीला हस्तांतरित करण्यात येईल.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *