मोठे फेरबदलः राज्यातील १७ आयएएस अधिकारी, ४४ आयपीएस अधिकारी आणि राज्य उत्पादन शुल्कच्या १९ अधिकाऱ्यांच्या बदल्या!


मुंबईः राज्य सरकारने ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रशासनात मोठे फेरबदल केले असून राज्यातील १७ आयएएस अधिकारी, ४४ आयपीएस अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पाच विभागीय उपायुक्त आणि १९ अधीक्षक आणि उपअधीक्षक अशा ८० अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

आयएएस अधिकारी

 जीएसटी मुंबईचे विशेष आयुक्त नितीन पाटील यांची राज्य मानवी हक्क  आयोगाच्या सचिवपदी बदली करण्यात आली आहे. दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव अभय महाजन यांची जीएसटी मुंबईच्या विशेष आयुक्तपदी, तर एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय सहसंचालक संजय यादव यांची मुंबई शहराच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

 कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद पुणे येथे संचालकपदी, मुंबई शहराचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारीपदी तर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेचे संचालक अमोल येगडे यांची कोल्हापूरच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनूज जिंदल यांची एमएसआरडीसीच्या व्यवस्थापकीय सहसंचालकपदी तर बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांची छत्रपती संभाजीनगर येथे सिडकोच्या (नवीन शहरे) मुख्य प्रशासकपदी बदली करण्यात आली आहे.

अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पांडा यांची नागपूर येथे टेक्सटाइल आयुक्तपदी, गडचिरोलीतील अहेरी उपविभागाचे सहायक जिल्हाधिकारी आणि आयटीडीपीचे प्रकल्प अधिकारी वैभव वाघमारे यांची वाशिम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

पालघर जिल्ह्यातील डहाणू उपविभागाच्या सहायक जिल्हाधिकारी आणि आयटीडीपीच्या प्रकल्प अधिकारी संजिता मोहपात्रा यांची अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. नंदूरबार जिल्ह्यातील तळोदा उपविभागाचे सहायक जिल्हाधिकारी आणि आयडीटीपीचे प्रकल्प अधिकारी मंदार पत्की यांची यवतमाळ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बदली करण्यात आली आहे.

मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या कार्यालयातील सहसचिव मकरंद देशमुख यांची सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी करण्यात आली आहे तर गुजरात केडर बदलून महाराष्ट्र केडरमध्ये आलेल्या नितीशा माथूर यांच्यावर नंदूरबार जिल्ह्यातील तळोदा उपविभागाच्या सहायक जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर उपविभागाच्या सहायक जिल्हाधिकारी मानसी यांची याच जिल्ह्यातील देसाईगंज उपविभागाच्या सहायक जिल्हाधिकारीपदी, नाशिक जिल्ह्यातील चांदवड उपविभागाचे सहायक जिल्हाधिकारी पुलकित सिंग यांची याच जिल्ह्यातील कळवण उपविभागाच्या सहायक जिल्हाधिकारीपदी तर बीड उपविभागाच्या सहायक जिल्हाधिकारी करीश्मा नायर यांची पाघर जिल्ह्यातील जव्हार उपविभागाच्या सहायक जिल्हाधिकारी आणि आयटीडीपीच्या प्रकल्प अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

आयपीएस अधिकारी

आज तब्बल ४४ आयपीएस अधिकाऱ्यांचीही बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात पुण्याचे पोलि आयुक्त रितेश कुमार यांची मुंबईत होमगार्डच्या समादेशकपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या ठिकाणी नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची बदली करण्यात आली आहे. होमागार्ड्सचे उपमहानिदेशक व अपर पोलिस महासंचालक प्रभात कुमार यांची नागरी संरक्षण विभागाच्या संचालकपदी बदली करण्यात आली आहे.

मुंबईच्या वाहतूक विभागाचे उपल पोलिस महासंचालक रविंद्रकुमार सिंगल यांची नागपूरच्या पोलिस आयुक्तपदी, राज्य गुप्तवार्ता विभागाचे सहआयुक्त शिरीष जैन यांची राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्तपदी पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आली आहे. महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक विभाग, मुंबईचे विशेष पोलिस महानिरीक्षक दीपक पांडे यांना तेथेच अपर पोलिस महासंचालकपदी पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली आहे.

ठाणे शहरचे पोलिस सहआयुक्त दत्तात्रय कराळे यांची नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी, पिंपरी चिंचवडचे पोलिस सहआयुक्त संजय शिंदे यांची पुण्यात राज्य गुन्हा अन्वेषण विभागाच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी, कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीण पवार यांची पुणे शहराच्या पोलिस सहआयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

बृहन्मुंबई वाहतूक विभागाचे पोलिस सहआयुक्त प्रवीणकुमार पडवळ यांची प्रशिक्षण व खास पथके विभागाच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी, आणि येथील संजय दराडे यांची कोकण परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांची ठाणे शहर पोलिस सहआयुक्तपदी, मुंबईतील गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक एस.डी. एनपुरे यांची नवी मुंबईच्या पोलिस सहआयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

 अमरावतीचे पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांना तेथेच त्याच पदावर पदउन्नत करून पदस्थापना देण्यात आली आहे. गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांची नागपूरच्या नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलिस महानिरीक्षकपदी, बृहन्मुंबईचे विशेष शाखेचे अपर पोलिस आयुक्त विरेंद्र मिश्रा यांची छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.

 पुणे शहर उत्तर विभागाचे अपर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांची पुण्यात आर्थिक गुन्हे शाखा, गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. पुण्यातील गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपमहानिरीक्षक नामदेव चव्हाण यांची नागपुरात राज्य राखीव पोलिस बलाच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.

 सोलापूर शहराचे पोलिस आयुक्त राजेंद्र माने यांची नाशिकच्या महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या सहसंचालकपदी, पुण्यातील राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक ५ चे समादेशक विनीता साहु यांची बृहन्मुंबईच्या संरक्षण व सुरक्षा विभागाच्या अपर पोलिस आयुक्तपदी, जळगावचे पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांची सोलापूर शहरच्या पोलिस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

पुणे ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक अंकिता गोयल यांची गडचिरोली परिक्षेत्राच्या पोलिस उपमहानिरीक्षकपदी, सांगलीचे पोलिस अधीक्षक बस्वराज तेली यांची पुण्यात गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिस उपमहानिरीक्षकपदी, पुण्यातील राज्य राखीव पोलिस बल गट क्रं.१ चे समादेशक शैलेश बलकवडे यांची पुणे शहर अपर पोलिस आयुक्तपदी (गुन्हे) बदली करण्यात आली आहे.

नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांची बृहन्मुंबईत विशेष शाखेच्या अपर पोलिस आयुक्तपदी, कोल्हापूरच्या राज्य राखीव पोलिस बलाचे समादेशक एस.जी. दिवाण यांची पुण्यात पोलिस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या पोलिस उपमहानिरीक्षकपदी तर मुंबईतील सायबर विभागाचे पोलिस अधीक्षक संजय शिंत्रे यांची मुंबईतच जीएसटी दक्षता विभागाच्या पोलिस उपमहानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.

बृहन्मुंबईचे पोलिस उपआयुक्त मनोज पाटील यांची पुणे शहर उत्तर विभागात अपर पोलिस आयुक्तपदी, ठाणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांची नाशिक ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकपदी, पुण्यातील गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांची पुणे ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.

बृहन्मुंबईत मुख्यालय-१ चे पोलिस उपायुक्त एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांची जळगावच्या पोलिस अधीक्षकपदी, बृहन्मुंबईचे पोलिस आयुक्त अजयकुमार बन्सल यांची जालन्याच्या पोलिस अधीक्षकपदी, चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांची परभणीच्या पोलिस अधीक्षकपदी, परभणीचे पोलिस अधीक्षक रागसुधा आर. यांची बृहन्मुंबईच्या पोलिस उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असलेले संदीप घुगे यांना सांगलीचे पोलिस अधीक्षकपद देण्यात आले आहे. नागपूर शहरचे पोलिस उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांची चंद्रपूरच्या पोलिस अधीक्षकपदी, बृहन्मुंबईचे पोलिस उपायुक्त धोंडोपंत स्वामी यांची ठाणे ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. पंकज कुमावत यांना अमरावती ग्रामीणचे अपर पोलिस अधीक्षकपद देण्यात आले आहे.

अमरावती ग्रामीणचे अपर पोलिस अधीक्षक विक्रम साळी यांची मुंबईत पोलिस महासंचालक कार्यालयात नियोजन व समन्वय विभागात सहायक पोलिस महानिरीक्षकपदी, बारामतीचे अपर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे यांची बृहन्मुंबईच्या पोलिस उपआयुक्तपदी, नागपूर ग्रामीणचे अपर पोलिस अधीक्षक संदीप पखाले यांची नागपुरात नक्षलवाद विरोधी अभियानात विशेष कृती गटाचे पोलिस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.

पोलिस महासंचालक कार्यालयातील नियोजन व समन्वय विभागातील सहायक पोलिस महानिरीक्षक रमेश धुमाळ यांची नागपूर ग्रामीणच्या अपर पोलिस अधीक्षकपदी तर मुंबईतील अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त (दक्षता) समाधान पवार यांची बृहन्मुंबईच्या पोलिस उपआयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

विभागीय उपायुक्त, राज्य उत्पादन शुल्क

 राज्य उत्पादन शुल्क विभागातील विभागीय उपायुक्तांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात छत्रपती संभाजीनगर (औरंगाबादचे विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांची ठाण्याच्या विभागीय उपायुक्तपदी, नांदेडच्या विभागीय उपायुक्त उषा वर्मा यांची नाशिकच्या विभागीय उपायुक्तपदी, नाशिकचे विभागीय उपायुक्त बाबू हमीद तडवी यांची नांदेडच्या विभागीय उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

 ठाण्याचे विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे यांची अंमलबजावणी दक्षता विभागाच्या संचालकपदी बदली करण्यात आली आहे. मुंबईच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उपायुक्त संगीता दरेकर यांची छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

 राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक

 धुळ्याचे अधीक्षक मनोज शेवरे यांची सिंधुदुर्गच्या अधीक्षकपदी, साताऱ्याचे अधीक्षक श्रीमती किर्ती शेगडे यांची रत्नागिरीत अधीक्षकपदी आणि वर्धा येथील अधीक्षक स्वाती काकडे यांची धुळ्याच्या अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने या विशेष बदल्या करण्यात आल्या आहेत.

राज्य उत्पादन शुल्क उपअधीक्षक

बॉम्बे ब्रेवरीज रायगडचे उपअधीक्षक उत्तमराव शिंदे यांची हडपसर येथे, रत्नागिरीचे उपअधीक्षक वैभव वैद्य यांची ठाणे अधीक्षक कार्यालयात, मुंबई उपनगर-३चे उपअधीक्षक सुरजकुमार रामोड यांची बॉम्बे ब्रेवरीज रायगड येथे बदली करण्यात आली आहे.

ठाण्याचे उपअधीक्षक सी.पी. हांडे यांची पालघरच्या जीएम ब्रेवरीजच्या उपअधीक्षकपदी, नाशिकच्या  परनार्ड रिकार्डचे उपअधीक्षक हर्षवर्धन शिंदे यांची रत्नागिरीत, प्रवरानगर येथील पदमश्री विखे पाटील सहकारी साखर कारखाना येथील उपअधीक्षक सुजित पाटील यांची पिंपरी चिंचवड येथे, टिळकनगर आसवणी येथील उपअधीक्षक जितेंद्र गोगावले यांची मुंबई उपनगर-३ येथे बदली करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड येथील उपअधीक्षक युवराज शिंदे यांची कोल्हापूर अधीक्षक कार्यालयात, हडपसर येथील उपअधीक्षक संजय पाटील यांची सोलापूर येथे, कोल्हापूर अधीक्षक कार्यालयातील उपअधीक्षक राजाराम खोत यांची टिळकनगर आसवणी येथे, छत्रपती संभाजीनगरच्या रेडिको एनव्ही डिस्टीलरीचे अपअधीक्षक ए.डी. देशमुख यांची प्रवरानगर येथे बदली करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांना तातडीने रूजू होण्यास सांगण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!