मंत्रिमंडळ बैठकीत मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्याला नेमके काय मिळाले? वाचा जिल्हानिहाय सविस्तर घोषणा


छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद):  मराठवाड्याचा कायापालट घडवणारा तब्बल ४६ हजार ५७९ कोटी ३४ लाख रुपयांचा संकल्प आज शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. यामध्ये नदीजोड प्रकल्पाच्या सुधारित रक्कमेचा समावेश नाही.

छत्रपती संभाजीनगर येथील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते. मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व करणारे स्वामी रामानंद तीर्थ यांचा पुतळा नवी दिल्ली येथे उभारण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. छत्रपती संभाजीनगर मधील ३०० वर्षे जुन्या तीन पुलांचे नुतनीकरण करण्याचा निर्णयही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला.

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, नियोजन, ग्रामविकास, कृषी तसेच पशूसंर्वधन आदी विभागांशी निगड़ीत विविध निर्णय घेण्यात आले.

नगरविकास विभाग

  • मराठवाड्यातील विविध शहरांमधील मुलभूत सोयीसुविधा विकासासाठी एकूण रुपये ६४०.२९ कोटी निधी. त्यापैकी रुपये ५३४.७४ कोटी नगरपरिषद/ नगरपंचायत क्षेत्रासाठी तर रुपये ५०५.५५ कोटी महानगरपालिका क्षेत्रासाठी मंजूर.
  • केंद्र पुरस्कृत अमृत २.० -छत्रपती संभाजीनगर शहरासाठी रुपये २,७४०.७५ कोटी किंमतीचा पाणीपुरवठा प्रकल्प रुपये, २७५.६८ कोटी किंमतीचा मलनि:स्सारण प्रकल्प तर रुपये २.७८ कोटी किंमतीचा सरोवर पुनरुज्जीवनाचा प्रकल्प असे एकूण रुपये ३,०५९.२१ कोटी किमतीचे प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत.
  • नांदेड वाघाळा महानगरपलिकेसाठी रुपये ३२९.१६ कोटी किमतीचा मलनि:स्सारण प्रकल्प.
  • अर्धापूर नगरपंचायतेसाठी रुपये २५.१३ कोटी किंमतीचा सरोवर पुनरुज्जीवनाचा प्रकल्प.
  • भूम नगरपरिषदेसाठी रुपये १.८३ कोटी किंमतीचा सरोवर पुनरुज्जीवनाचा प्रकल्प.
  • माहूर नगरपरिषदेसाठी रुपये २४.६२ कोटी किंमतीचा सरोवर पुनरुज्जीवनाचा प्रकल्प.
  • पेठ उमरी नगरपंचायतेसाठी रुपये ३.६० कोटी किंमतीचा सरोवर पुनरुज्जीवनाचा प्रकल्प.
  • हिंगोली शहरासाठी रुपये १०४.२८ कोटी किंमतीचा रस्ते विकास प्रकल्प.

औंढा नागनाथ तिर्थक्षेत्रासाठी रुपये ३६.४४ कोटी किंमतीचा पाणीपुरवठा प्रकल्प.

  • खुलताबाद शहरासाठी रुपये २१.३२ कोटी किमतीचा पाणीपुरवठा प्रकल्प.
  • नळदुर्ग शहरासाठी रुपये ९३.४२ कोटी किंमतीचा रस्ते विकास प्रकल्प.
  • माजलगांव शहरासाठी रुपये ४६.५४ कोटी किंमतीचा रस्ते विकास प्रकल्प.
  • लोहा शहरासाठी रुपये ६६.३९ कोटी किंमतीचा पाणीपुरवठा प्रकल्प.
  • तुळजापूर तीर्थक्षेत्रासाठी रुपये १५८.५२ कोटी किंमतीचा रस्ते विकास प्रकल्प.
  • उमरगा शहरासाठी रुपये १२६.८२ कोटी किंमतीचा रस्ते विकास प्रकल्प.
  • अंबड शहरातील भुयारी गटार प्रकल्प रुपये १६.५६ कोटी निधी उपलब्ध करून देण्यात येईल.
  • जालना शहर पाणीपुरवठा प्रकल्पामध्ये ३५ एमएलडी क्षमतेचे अंबड येथे जलशुध्दीकरण केंद्र व १५ एमएलडी क्षमतेचे जालना येथे जलशुध्दीकरण केंद्र बांधण्यासाठी रुपये ५६.०० कोटी निधी उपलब्ध करून देण्यात येईल.
  • जाफराबाद शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात येईल. त्यासाठी ४७.९८ कोटी रुपये खर्चास मान्यता.
  • नांदेड वाघाळा महानगरपालिका घनकचरा प्रकल्प- रुपये ८.०७ कोटी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.
  • श्री. क्षेत्र परळी वैजनाथ ज्योर्तिलिंग विकास आराखडा- रुपये २८६.६८ निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.
  • औंढा नागनाथ विकास आराखडा रुपये ५० कोटी निधी उपलब्ध करून देण्यात येईल.
  • परभणी शहराची रुपये १५७.११ कोटी किंमतीची समांतर पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात येईल.
  • परभणी शहराची रुपये ४०८.८३ कोटी किंमतीचा मलनि:स्सारण प्रकल्प मंजूर करण्यात येईल.
  • लातूर रस्ते विकास प्रकल्प रुपये ४१.३६ कोटी मंजूर करण्यात येईल.
  • नाट्यगृहाचे उर्वरित बांधकाम पूर्ण करण्याकरिता लातूर महानगरपालिकेस रुपये २६.२१ कोटी व परभणी महानगरपालिकेस रुपये ११.७५ कोटी निधी मंजूर करण्यात येईल.
  • उदगीर नगरपरिषदेस नाट्यगृहाच्या बांधकामासाठी रुपये १२ कोटी निधी मंजूर करण्यात येईल.
  • उदगीर शहरात भूमीगत गटार यंत्रणा.
  • नांदेड वाघाळा महानगरपालिका क्षेत्रातील कार्यान्वीत असलेल्या घनकचरा प्रकल्प व प्रगतीपथावर असलेल्या बायोगॅस प्रकल्पासाठी रुपये ८.०७ कोटी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.

जलसंपदा विभाग

  • मराठवाड्यातला दुष्काळ हटवणार. पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवणार. २२.९अब्ज घन फूट पाणी वळवण्यासाठी १४ हजार ४० कोटींची योजना राबवणार.
  • पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचे रूप पालटवणार. त्यासाठी १५० कोटींची तरतूद.
  • वैजापूर तालुक्यातील शनिदेवगावला उच्चपातळीचा बंधारा. १७९३ हेक्टर क्षेत्र सिंचित होणार. २८५ कोटी ६४ लाखांची तरतूद.

मराठवाड्यातील तीर्थक्षेत्रांचा विकास

  • वेरूळ येथील श्री क्षेत्र घृष्णेश्वर मंदिराचा सुधारित विकास आराखडा. १५६.६३ कोटींची तरतूद.
  • श्री तुळजा भवानी मंदिराचा१३२८कोटींचा विकास आराखडा मंजूर.
  • श्री क्षेत्र औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र विकासासाठी ६०.३५ कोटींची तरतूद.
  • उदगीर येथे बाबांच्या समाधी स्थळ विकास आराखड्यासाठी १ कोटी रुपये मंजूर.
  • सिल्लोड तालुक्यातील मोजे केळगावचे श्री. मुर्डेश्वर महादेव मंदिर देवस्थानाच्या ४५ कोटींच्या विकास आराखड्यास मान्यता.
  • पाथरी येथे साईबाबा तीर्थक्षेत्र विकास आराखडा. ९१.८० कोटींच्या खर्चास मान्यता.
  • मानव विकास कार्यक्रमात १०० बसेस पुरवण्यासाठी ३८ कोटींची तरतूद

महिला व बालविकास विभाग

-मराठवाड्यातील ३४३९ अंगणवाड्यांच्या बांधकामांचा तीन वर्षांचा कालबद्ध कार्यक्रम. ३८६.८८ कोटींची तरतूद.

शालेय शिक्षण

  • मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई स्व. दगडाबाई शेळके यांचे धोपटेश्वर येथे यथोचित स्मारक उभारणार. ५ कोटींची तरतूद.
  • मराठवाड्यातील स्वातंत्रसेनानीच्या गावातील शाळा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेतून विकसित करणार. ७६ तालुक्यांतून शाळा निवडणार. विविध सुविधांसाठी ९५ कोटी.
  • बीड जिल्ह्यांतील ऊस तोड कामगारांच्या मुलींसाठी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना. १६०० मुलींना लाभ. ८०.०५ कोटींच्या खर्चास मान्यता.
  • मराठवाड्यातील निजामकालीन शाळांची दुरुस्ती व पुनर्बांधणी करणार. २० टक्के लोकसहभागाची अट शिथिल. २०० कोटींच्या खर्चास मान्यता.
  • परभणी जिल्ह्यातील सोनपेठ आणि पालम तालुक्यांमध्ये कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय सुरु करणार. ४०० मुलींना शिक्षण घेणे शक्य. २०.७३ कोटींच्या खर्चास मान्यता.

क्रीडा विभाग

  • परभणी जिल्हा क्रीडा संकुलासाठी कृषी विभागाची जागा मंजूर. १५ कोटींच्या खर्चास मान्यता.
  • छत्रपती संभाजीनगर येथे क्रीडा विद्यापीठ स्थापण्यासाठी समिती गठीत. ६५६.३८ कोटी खर्चून अद्ययावत क्रीडा विद्यापीठ उभारणार.
  • कलाग्रामच्या जागेवर एमआयडीसी आणि मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारणार.
  • परळीत ५ कोटींचे तालुका क्रीडा संकुल उभारणार.
  • उदगीर तालुक्यात जळकोट येथे ५ कोटी खर्चून क्रीडा संकुल उभारणार.
  • परभणी जिल्हा क्रीडा संकुलाचे अद्ययावतीकरण करण्यासाठी १५ कोटीस मंजुरी.

पशुसंवर्धन विभाग

  • मराठवड्यात दुधाची क्रांती येणार. सर्व जिल्ह्यातील ८,६०० गावांत दुधाळ जनावरांचे वाटप. ३ हजार २२५ कोटींच्या खर्चास मान्यता.
  • तुळजापूर तालुक्यात शेळी समूह योजना राबवण्यासाठी १० कोटींच्या खर्चास मान्यता.
  • देवणी या गोवंशीय प्रजातीच्या उच्च दर्जाची वंशावळ निवड – ४ कोटींच्या खर्चास मान्यता.

पर्यटन विभाग

  • फर्दापूर, छत्रपती संभाजीनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान उभारणार. प्रत्येकी ५० कोटींच्या खर्चास मंजुरी.
  • उदगीर तालुक्यातील हत्तीबेट पर्यटनस्थळाच्या विकासासाठी ५ कोटींच्या खर्चास मंजुरी.
  • अंबड येथील मत्स्योदरीदेवी संस्थानाचा विकासासाठी ४० कोटी रुपये खर्चास मंजुरी.

सांस्कृतिक कार्य विभाग

मराठवाड्यातील विविध स्मारके, प्रसिद्ध मंदिरांचा विकास करणार. त्यात अंबेजोगाई, संगमेश्वर, तर, महादेव मंदिर माणकेश्वर, तेर मंदिर, महालक्ष्मी मंदिर, होट्टल मंदिर, भोग नृसिंह, गुप्तेश्वर मंदिर धाराशूर, चारठाणा मंदिर समूह आदिच्या विकासासाठी २५३ कोटी ७० लाख रुपये देणार.

महसूल विभाग

  • बीड येथे जिल्हाधिकारी इमारत उभारणीसाठी ६३.६८ कोटींच्या खर्चास मंजुरी.
  • वसमत येथे मॉडर्न मार्केटच्या उभारणीसाठी जागा देणार.
  • लातूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयाची मध्यवर्ती प्रशासकीय इमारत उभारणार.

वन विभाग

  • लातूर, वडवाव, नागनाथ टेकडी विकास करणार. ५.४२ कोटींच्या खर्चास मंजुरी.
  • माहूर येथे वनविश्रामगृह बांधणार.

मदत व पुनर्वसन

  • वसमत मौजे कुरुंदा येथे पूर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यासाठी ३३.०३ कोटींच्या खर्चास मंजुरी.
  • मराठवाड्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा मजबूत करणार. प्रादेशिक आपत्ती प्रतिसाद केंद्र आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन केंद्राचे बळकटीकरण करण्यासाठी ५५.६९ कोटी रुपये खर्चास मंजुरी.
  • धारुर तालुक्यातील सुकळी या गावचे पुनर्वसन करण्यास मंजुरी.

उद्योग विभाग

  • आष्टी येथे कृषिपुरक क्षेत्रासाठी एमआयडीसी उभारणार. ३८ कोटी रुपये खर्चास मंजुरी.
  • वसमत, चाकूर, वडवणी (पुसरा), मौजे सिरसाळा ता. परळी येथे एमआयडीसी स्थापन करण्यास मंजुरी.
  • उदगीर आणि जळकोट येथे एमआयडीसी मंजूर.
  • धाराशिव जिल्ह्यात विश्वकर्मा रोजगार योजना राबवणार.

सार्वजनिक बांधकाम

  • मराठवाड्यातील रस्ते सुधारणार ३०० किलो मीटर लांबीच्या रस्त्यांची कामे हाती घेणार. २ हजार ४०० कोटींच्या खर्चास मंजुरी.
  • नाबार्डच्या अर्थसहायातून मराठवाड्यात ४४ कामे हाती घेणार. १०९ कोटींच्या खर्चास मंजुरी.
  • हायब्रिड ऍन्यूईटी योजनेतून मराठवाड्यातील १ हजार ३० किलो मीटर लांबीचे रस्ते सुधारणार. १० हजार ३०० कोटी रुपये खर्चास मान्यता.
  • साबरमती घाटाप्रमाणे नांदेडचा गोदावरी घाटाचे सौंदर्य खुलणार. रिव्हर फ्रंटसाठी १०० कोटी रुपये खर्चास मान्यता.
  • औसा तालुक्यातील मातोळा येथे तसेच कंधार तालुक्यातील मौजे कल्हाळी येथे हुतात्म्यांचे स्मारकांची उभारणी करणार.
  • लोहारा तालुक्यातील मौजे हिप्परगा येथे बहुउद्देशीय इमारत उभारणार.
  • पाटोदा येथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीस निधी देण्यास मान्यता.
  • बीड येथे प्रशासकीय इमारतीचे बांधकामास मंजुरी.
  • लातूर-बार्शी-टेंभुर्णी महामार्गाचे चार पदरीकरण करण्यास मंजुरी.

ग्रामविकास विभाग

  • मराठवाड्यातील ७५ ग्रामपंचायतींना आता स्वत:चे कार्यालय मिळणार आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत पुढील ३ वर्षात १८० कोटी देणार.
  • बीड येथे जिल्हापरिषदेची नवीन इमारत बांधण्यासाठी ३५ कोटी रुपये खर्चास मान्यता.

ऊर्जा विभाग

परळी औष्णीक विद्युत केंद्र येथील प्लांट्सना मंजुरी.

गृह विभाग

  • नांदेड शहरात सीसीटीव्हीचे जाळे उभारून शहर सुरक्षित करण्यास मान्यता. त्यासाठी १०० कोटी रुपये खर्चास मंजुरी.
  • निजामकालीन १८ पोलीस स्टेशन्सचा कायापालट करण्यासाठी ९२.८० कोटी रुपये खर्चास मंजुरी.
  • बीड, परळी, अंबाजोगाई येथे पोलिसांच्या निवासस्थान बांधणीसाठी ३०० कोटी रुपये.
  • छत्रपती संभाजीनगर येथील क्रांतीचौक पोलीस ठाणे इमारत आणि निवासस्थाने तसेच मिल कॉर्नर येथील निवासस्थाने उभारणीसाठी १९१ कोटी ६५ लाख रुपये खर्चास मंजुरी.

परिवहन विभाग

  • मराठवाड्यातील विविध शहरांतील बस स्थानकांमध्ये अमूलाग्र बदल करणार.
  • छत्रपती संभाजीनगर विभागात आधुनिक १ हजार १९७ ई-बसेस चालवणार. त्यासाठी ४२१ कोटी रुपये खर्चास मान्यता.
  • छत्रपती संभाजीनगर विभागात वाहन निरिक्षण व परिक्षण केंद्र स्थापन करणार. त्यासाठी १३५.६१ कोटी रुपये खर्चास मंजुरी.
  • राज्यातील ९ राष्ट्रीय महामार्गावर Intelligent Traffic Management System बसवणार. पुणे-छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या प्रकल्पास मान्यता.  त्यासाठी १८८.१९ कोटी खर्चास मान्यता.
  • छत्रपती संभाजीनगर व नांदेड येथे स्वयंचलित चाचणी पथ प्रकल्पासाठी १०.३७ कोटी रुपये खर्चास मान्यता.

माहिती व तंत्रज्ञान संचालनालय

  • मराठवाड्यात ४३२ ग्रामपंचायतीना भारतनेट जोडणी वर्षभरात देणार. २८६ कोटी रुपये.
  • छत्रपती संभाजीनगर व नांदेड येथे विद्यापीठ परिसरात मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यासाठी माहिती संग्रहालय.

रोजगार हमी योजना

मराठवाड्यात ४ लाख विहिरींचा कार्यक्रम राबवणार.

कृषी विभाग

  • आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी बीड येथे सीताफळ आणि इतर फळांवर प्रक्रिया उद्योगासाठी ५ कोटी रुपये.
  • हळद संशोधनास आता वेग येणार. हिंगोलीतील हरिद्रा संशोधन केंद्रासाठी १०० कोटी रुपये.
  • अंबाजोगाई येथील शासकीय कृषी महाविद्यालयात मुलामुलींचे वसतिगृह सुरु करण्यासाठी १०५ कोटी रुपये.

सार्वजनिक आरोग्य विभाग

अहमदपूर, चाकूर, माजलगाव येथे ट्रॉमा केअर सेंटर, धारुर तालुक्यातील तेलगाव तसेच वडवली येथे ग्रामीण रुग्णालयास निधी, किनगाव ग्रामीण रुग्णालय बांधकामासाठी एकूण ३७४ कोटी ९१ लाख रुपये.

मृद व जलसंधारण

अहमदपूर तालुक्यातील मानार नदीवर ९ कोल्हापुरी बंधारे. पाटोदा तालुक्यातील रोहतवाडी आणि उंबर विहिरा साठवण तलाव, आष्टी आणि शिरुर तालुक्यात कोल्हापूर बंधाऱ्यांचे लातूर टाईप बॅरेजमध्ये रुपांतर आणि गंगाखेड तालुक्यातील मासोळी, घळाटी, टोकवाडी आणि पोखर्णी नदीवर सिमेंट नाले बंधारे बांधण्यास मंजुरी.

अल्पसंख्याक विकास

  • अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी परदेशात पदव्युत्तर पदवी व पीएचडी अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती.
  • छत्रपती संभाजीनगर येथे अल्पसंख्याक आयुक्तालय व जिल्हा स्तरावर स्वतंत्र कार्यालय.
  • डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेच्या अनुदानात वाढ. तसेच पारंपारिक शिक्षणाबरोबर बोर्डाच्या शालेय अभ्यासक्रमाचे शिक्षण देणारे मदरसांचे अनुदान २ लाखावरुन १० लाखांपर्यंत वाढवण्यास मंजुरी.
  • परळी वैजनाथ विकास आराखड्यात आयुर्वेद पार्कचा समावेश, वेरूळ येथे शहाजी राजे भोसले यांचे स्मारक उभारणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *