छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने १०८ औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदार संघातील चार मतदान केंद्रांचे ठिकाण व पाच मतदान केंद्रांचे नावात बदल करण्यात आला असून या बदलास निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी उमाकांत पारधी यांनी कळवले आहे.
या मतदान केंद्रांच्या ठिकाणात बदल: मतदान केंद्र क्रमांक १७८ पुर्वीचे केंद्र प्रगती विद्यालय पडेगाव खो.क्र.१ पूर्व बाजूऐवजी आता इंडो माईंडस प्रेस्कूल पडेगाव खोली क्रमांक १ मध्ये असेल.
- मतदान केंद्र क्रमांक १७९ पुर्वीचे प्रगती विद्यालय पडेगाव खो.क्र.२ पूर्व बाजूऐवजी आता इंडो माईंडस प्रेस्कूल पडेगाव खोली क्रमांक २ मध्ये असेल.
- मतदान केंद्र क्रमांक २४१ पूर्वीचे तलत उर्दू माध्यम प्रा. शा. शहानूरवाडी खोली क्रमांक १ पूर्व बाजू ऐवजी आता इंडोब्रेन्स प्रेस्कूल, प्रतापनगर खोली क्रमांक १ मध्ये असेल.
- मतदान केद्र क्रमांक २४२ पूर्वीचे तलत उर्दू माध्यम प्रा. शा. शहानूरवाडी खोली क्रमांक २ पूर्व बाजूऐवजी आता इंडोब्रेन्स प्रिस्कूल प्रतापनगगर, खोली क्रमांक २ मध्ये असेल.
नावात बदल झालेली मतदान केंद्र
: मतदान केंद्र क्रमांक १७ पूर्वीचे नाव सह्याद्री टेक्निकल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स खोली क्र. १ पूर्व बाजूऐवजी आता माता रमाबाई आंबेडकर महिला विधी कॉलेज, वाळूज महानगर-१, खोली क्रमांक १ असे असेल.
- मतदान केंद्र क्रमांक १८ पूर्वीचे नाव सह्याद्री टेक्निकल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स खोली क्र.२ पूर्व बाजूऐवजी आता माता रमाबाई आंबेडकर महिला विधी कॉलेज, वाळूज महानगर-१, खोली क्रमांक २ असे असेल.
- मतदान केंद्र क्रमांक १९ पूर्वीचे नाव सह्याद्री टेक्निकल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स खोली क्र.३ पश्चिम बाजूऐवजी आता माता रमाबाई आंबेडकर महिला विधी कॉलेज, वाळूज महानगर-१, खोली क्रमांक ३ असे असेल.
- मतदान केंद्र क्रमांक २० पुर्वीचे नाव सह्याद्री टेक्निकल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स खोली क्र.४ पूर्व बाजूऐवजी आता माता रमाबाई आंबेडकर महिला विधी कॉलेज, वाळूज महानगर-१, खोली क्रमांक ४ असे असेल.
- मतदान केंद्र क्रमांक २१ पूर्वीचे नाव सह्याद्री टेक्निकल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स खोली क्र.५ पश्चिम बाजूऐवजी आता माता रमाबाई आंबेडकर महिला विधी कॉलेज, वाळूज महानगर-१, खोली क्रमांक ५ असे असेल.
असे औरंगाबाद पश्चिमचे निवडणूक निर्णय अधिकारी उमाकांत पारधी यांनी कळविले असून अधिक माहितीसाठी त्यांचे कार्यालय शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, रेल्वेस्टेशन रोड, छत्रपती संभाजीनगर येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.