आरोग्य विभागातील नोकर भरतीसाठी अर्ज सादर करण्याची मुदत २२ सप्टेंबरपर्यंत वाढवली, लगेच करा अर्ज!


मुंबई: आरोग्य विभाग अंतर्गत गट ‘क’ व गट ‘ड’ संवर्गातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरतीसाठी दुर्गम भागातील उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अडचणी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर अर्ज करण्यासाठीची अंतिम मुदत २२ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांना १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता आले नव्हते, ते आता या दोन दिवसांत अर्ज करू शकतील.

आरोग्य विभागातील या रिक्त पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृत करण्यात येत आहे. अर्ज सादर करण्यासाठी २९ ऑगस्टपासून नोंदणी सुरू असून त्याची अंतिम तारीख १८ सप्टेंबर होती. परंतु दुर्गम भागातील व इतर उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यास २२ सप्टेंब र२०२३ रोजी रात्री ११.५५ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधीही २२सप्टेंबरच्या रात्री ११.५५ वाजेपर्यंत असणार आहे. यापूर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. अर्ज सादर करण्यास दिलेली ही मुदतवाढ अंतिम असून यापुढे मुदतवाढ देण्यात येणार नाही, असेही आयुक्त आरोग्य सेवा यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!