
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): भारतीय सैन्य दलातील भरतीसाठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली असून ऑनलाईन नोंदणी करण्याची सुविधा सैन्य दलाच्या वेबसाइट www.joinindianarmy.nic.in वर उपलब्ध करण्यात आली आहे.
ऑनलाइन सामान्य प्रवेश परीक्षा (CEE): सर्व उमेदवारांसाठी नामांकित केंद्रांवर CEE परीक्षा होईल. अग्निवीर लिपिक/SKT श्रेणीसाठी टायपिंग चाचणीदेखील घेतली जाईल. CEE उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती रॅलीदरम्यान शारीरिक चाचणी आणि मापन चाचणी होईल.
ॲडाप्टेबिलिटी चाचणीसाठी उमेदवारांनी उमेदवारांनी यापूर्वीच कार्यरत असलेला स्मार्ट फोन, पुरेशी बॅटरी आणि 2GB डेटा सोबत आणणे आवश्यक आहे. या परीक्षेसाठी १० एप्रिलपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे.
अग्निवीर उमेदवारांसाठी विशेष सुविधा: उमेदवार त्याच्या पात्रतेनुसार कोणत्याही दोन श्रेणींसाठी अर्ज करू शकतो. दोन पर्याय निवडणाऱ्या उमेदवारांना दोन्ही गटांसाठी वेगवेगळे अर्ज भरावे लागतील व प्रत्येक श्रेणीसाठी वेगळी CEE परीक्षा द्यावी लागेल. मात्र, फक्त एकदाच भरती रॅली व वैद्यकीय चाचणी द्यावी लागेल.
क्रीडा खेळाडू, NCC प्रमाणपत्रधारक, ITI प्रशिक्षित आणि डिप्लोमाधारकांना विशेष गुण मिळतील. नोंदणी व परीक्षा प्रक्रियेबद्दल व्हिडिओ आणि सराव मॉक टेस्ट भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहेत: इच्छूक उमेदवार भारतीय सैन्य दलाचे अधिकृत संकेतस्थळ www.joinindianarmy.nic.in ला भेट देऊन अधिक माहिती घेऊ शकतात.
सैन्यदल अधिकारीपदाच्या परीक्षेसाठी मोफत पूर्वप्रशिक्षण
भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमदेवारांसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे मोफत प्रशिक्षणाची सुविधा करण्यात येते. येत्या ५ ते १४ मे या कालावधीत याबाबतचे प्रशिक्षण क्रमांक ६१ चे आयोजन करण्यात येत आहे. या प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थ्यांची निवास व भोजन व्यवस्था निः शुल्क करण्यात येते. या संधीचा लाभ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे ३ मे रोजी मुलाखतीस हजर रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुलाखतीस येते वेळी त्यांनी सैनिक कल्याण विभागाच्या www.mhasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन (Other – PCTC Nashik SSB-61) कोर्ससाठी संबंधित या परिशिष्टांची प्रिंट काढून व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन जावे. अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड, नाशिक यंचा ईमेल आयडी training.petcnashik@gmail.com व दूरध्वनी क्रमांक ०२५३-२४५१०३२ किंवा व्हॉट्सएप क्रमांक ९१५६०७३३०६ वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.