कसबा पेठ, चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक: एक्झिट पोल प्रसारित अथवा प्रकाशित करण्यावर बंदी


मुंबई: पुणे जिल्ह्यातील कसबा पेठ व चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे एक्झिट पोल्स प्रकाशित अथवा प्रसारित करण्यावर भारत निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे.

भारत निवडणूक आयोगाने  या दोन मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम १८ जानेवारी रोजी प्रसिद्ध केला आहे. या पोटनिवडणुकीसह देशाच्या इतर राज्यातील काही ठिकाणीही निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे १६ फेब्रुवारी रोजीच्या सकाळी सात वाजेपासून ते दिनांक २७फेब्रुवारी रोजीच्या सायंकाळी सात वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस मुद्रित अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यम किंवा इतर कोणत्याही माध्यमाद्वारे एक्झिट पोल आयोजित करण्यास, प्रकाशित करण्यास आणि प्रसारित करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाचे अवर सचिव तथा उपमुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी यांनी ही माहिती दिली आहे. लोकप्रतिनिधीत्व कायदा १९५१ च्या कलम १२६ (१) (ब) अन्वये असे करण्यास प्रतिबंध असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!