
मुंबई: राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षणा नोंदणी क्रमांक (एचएसआरपी) नंबरप्लेट बसवण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
महाराष्ट्र सरकारने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) पाटी बसवण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसवण्यासाठी ३१ मार्च २०२५ पर्यंत वाहनमालकांना मुदत देण्यात आली होती.
आजपर्यंत जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसवण्याचे काम कमी झाले असल्याने उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसवण्यासाठी आता ३० जून २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या जुन्या वाहनांना ही पाटी बसवण्याकरिता ३ संस्थाची/ उत्पादकांची परिवहन विभागामार्फत निवड केली आहे. संबंधित वाहन मालकांनी ०१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी असलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसवून घ्यावी, असे आवाहन परिवहन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
