‘खोकेवाले आमदार’मधून ‘मोकळं’ होण्याची शिंदे गटातील काही आमदारांची इच्छा: आ. बच्चू कडूंचा खळबळजनक गोप्यस्फोट


मुंबई: ‘खोकेवाले आमदार’ म्हटले जात असल्यामुळे वेदना होतात. ही शिंदे गटातील ५० आमदारांचेही ते दु:ख़ आहे. यातून ‘मोकळं’ होण्याची इच्छा यातील काहीजणांनी फोन करून माझ्याकडे व्यक्त केली होती, असा खळबळजनक गोप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी केला आहे.

महाविकास आघाडी सरकार पाडून राज्यात एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासूनच शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. आता शिंदे गटातीलच आमदार बच्चू कडू यांनीच केलेल्या या गोप्यस्फोटामुळे विरोधकांच्या आरोपाला पुष्ठी मिळाली आहे. त्याचबरोबर शिंदे गटाच्या आमदारांतील गटबाजीही समोर आली आहे.

राजकारणात तडजोडी कराव्या लागतात. मात्ऱगुवाहटीला गेल्यानंतर लोकांचा आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. या तडजोडीचे परिणाम भोगावे लागले,असे बच्चू कडू यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना सांगितले.

टाकीवर चढल्याने आधी मला लोक विरूवाले आमदार म्हणायचे. मग भिडू म्हणत होते. काही ठिकाणी अपंगांचे कैवारी म्हणत होते. आता त्यात ‘खोका’ आल्याने वेदना होत आहेत. शिंदे गटातील ५० आमदारांचेही तेच दु:ख आहे.त्याबाबत काही आमदारांनी मला फोन करून यातून ‘मोकळं’ होण्याची इच्छा व्यक्त केली होती, असे आ. कडू म्हणाले.

राजकारणात कोणासोबत गेल्याने पैसेच घेतले, असा त्याचा अर्थ होत नाही, असेही आ. कडू म्हणाले. परंतु उद्धव ठाकरेंची साथ सोडून ते एकनाथ शिंदेंसमवेत भाजपसोबत का गेले? हे मात्र आ. कडू यांनी स्पष्टपणे सांगितले नाही.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *