ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले विद्रोही साहित्य संमेलनात म्हणाले होते: इच्छा असूनही मी ‘मोदी इज ऍशहोल’ म्हणू शकत नाही, महिनाभरानंतर गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद): १९ व्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यांमुळे वाद निर्माण झाला आहे. टकले यांनी आपल्या भाषणात सामाजिक तेढ निर्माण होईल अशी वक्तव्ये केल्याच्या फिर्यादीवरून त्यांच्याविरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात भारतीय नागरी सुरक्षा संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नूतन कॉलनीतील रहिवासी आप्पासाहेब बाबासाहेब पारधे यांनी निरंजन टकले यांच्या विरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून निरंजन टकले यांच्या विरोधात भारतीय नागरी सुरक्षा संहितेच्या कलम ३५६ (२) आणि ३५३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील आमखास मैदानावर २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान १९...