भूमी अभिलेख विभाग सरळसेवा भरतीः भूकरमापक तथा लिपीकपदाची २८ ते ३० नोव्हेंबरदरम्यान परीक्षा
मुंबई: भूमी अभिलेख विभागातील गट ‘क’ पदसमूह (भूकरमापक तथा लिपिक) संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यात येणार आहेत. या पदाची परीक्षा २८,२९ आणि ३० नोव्हेंबर २०२२ रोजी होणार आहे. २८ नोव्हेंबर रोजी सत्र एक मध्ये पुणे विभागाची तर सत्र २ मध्ये कोकण विभागाची परीक्षा होईल. २९ नोव्हेंबर रोजी सत्र एक मध्ये औरंगाबाद विभागाची तर सत्र २ मध्ये नाशिक आणि अमरावती विभागाची परीक्षा होणार आहे. ३० नोव्हेंबर रोजी सत्र एक मध्ये नागपूर विभागाची परीक्षा होईल, अशी माहिती जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख संचालक एन.के. सुधांशू यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
परीक्षेचे विभागनिहाय वेळापत्रक व उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्राबाबत माहिती विभागाचे अधिकृत संकेतस्थळ http://mahabhumi.gov.in यावर उपलब्ध होणार आहे. संबंधित उमेदवारांने संकेतस्थळावरील सूचनांनुसार प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेवून परीक्षा द्यावय...