महानगरपालिका, नगरपालिका निवडणुकांची तयारीः मतदारांची नावे, पत्त्यात दुरूस्तीसाठी तातडीने मोहीम राबवण्याचे निर्देश
मुंबई: विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्यांतील मतदारांच्या नावांत तसेच इमारत, वस्ती, कॉलनी रहिवास क्षेत्राप्रमाणे पत्त्यामध्ये दुरूस्ती करण्यासाठी तातडीने मोहीम राबवावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान व मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे यांनी दिले.
विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्यांवरून प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासंदर्भात मदान यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे गुरूवारी बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. देशपांडे, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यावेळी उपस्थित होते.
भारत निवडणूक आयोगातर्फे सध्या विधानसभा मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. त्यांतर्गत ८ डिसेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारण्...