महाराष्ट्र

एमपीएससीची सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम २०२५ पासून लागू
महाराष्ट्र

एमपीएससीची सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम २०२५ पासून लागू

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएसी) सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम २०२३ ऐवजी २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा ही सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रमानुसार वर्णनात्मक स्वरुपात सन २०२३ पासून लागू करण्याबाबतचा निर्णय आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आला होता.  परंतु ही परीक्षा वर्णनात्मक स्वरुपात सन २०२५ पासून घेण्याची उमेदवारांची मागणी व त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती तसेच तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा अशी मागणी उमेदवारांनी केली होती. उमेदवारांची मागणी आणि अन्य बाबी विचारात घेऊन फेरविचारांती सुधारित परीक्षा योजना व नवीन अभ्यासक्रम वर्णनात्मक स्वरुपात सन २०२५ पासून घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेपासून लागू करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे, असे आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. लोकसेवा आयोगाच्...
नाट्यशास्त्राचा ‘बलात्कारी’ प्राध्यापक डॉ. अशोक बंडगर २२ दिवसांपासून मोकाटच, आता बडतर्फी टाळण्यासाठी फिल्डिंग!
महाराष्ट्र

नाट्यशास्त्राचा ‘बलात्कारी’ प्राध्यापक डॉ. अशोक बंडगर २२ दिवसांपासून मोकाटच, आता बडतर्फी टाळण्यासाठी फिल्डिंग!

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद): वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा या वेडाने झपाटलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. अशोक बंडगर याच्याविरोधात विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल होऊन तब्बल २२ दिवस उलटले तरी बेगमपुरा पोलिसांना त्याचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. जिल्हा  सत्र न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामिनासाठीचा अर्ज फेटाळून लावला आहे. दरम्यान, विद्यापीठ प्रशासनाकडून आपल्याविरोधात बडतर्फीची कारवाई होऊ नये, यासाठी बंडगरने खास दूतांमार्फत फिल्डिंग लावल्याची माहितीही समोर येत आहे. नाट्यशास्त्र विभागातील प्रा. डॉ. अशोक बंडगरच्या विरोधात त्याच्या पत्नीसह २५ एप्रिल रोजी बेगमपुरा पोलिस ठाण्यात भादंविच्या कलम ३७६(न), १०९, ११४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच बंडगर त्याची पत्नी आणि दोन मुलींसह फरार झाला...
‘१५ आमदार बाद होणार, अजित पवार भाजपबरोबर जाणार’, अंजली दमानियांच्या दाव्यामुळे राजकीय चर्चेला उधाण
महाराष्ट्र, राजकारण

‘१५ आमदार बाद होणार, अजित पवार भाजपबरोबर जाणार’, अंजली दमानियांच्या दाव्यामुळे राजकीय चर्चेला उधाण

मुंबईः  महाराष्ट्रातील १५ आमदार बाद होणार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपबरोबर जाणार, असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एका ट्विटमध्ये केला आहे. दमानिया यांच्या दाव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबतचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय असेल आणि त्यानंतर महाराष्ट्राचे राजकीय चित्र कसे असेल? याबाबत अनेक जण आपापल्या परीने अंदाज बांधत असतानाच अंजली दमानिया यांनी मंत्रालयातील एका घटनेचा संदर्भ देत हा दावा केला आहे. ‘आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तेथे एका व्यक्तीने मला थांबवले आणि एक गमतीशीर माहिती दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे १५ आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार भाजपबरोबर जाणार आहेत. तेही लवकरच. महाराष्ट्राच्या राजकारणाची आणखी किती दुर्शशा होतेय, ते बघू,’ असे दमानिया य...
कृषी आणि सेवा क्षेत्रात महाराष्ट्राची पिछेहाट, दरडोई उत्पन्नात देशात पाचव्या क्रमांकावर!
महाराष्ट्र, विशेष

कृषी आणि सेवा क्षेत्रात महाराष्ट्राची पिछेहाट, दरडोई उत्पन्नात देशात पाचव्या क्रमांकावर!

मुंबई:  कोरोना संकटाच्या काळातही कृषी आणि सेवा क्षेत्राने महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला आधार दिला होता. कोरोनाच्या संकटातून राज्याची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येऊ लागली असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत कृषी आणि सेवा क्षेत्र या दोन महत्वाच्या क्षेत्रांत महाराष्ट्राची पिछेहाट झाली आहे. विशेष म्हणजे दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर फेकले गेले आहे. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२२-२३’ चा अहवाल आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. या पाहणीच्या पूर्वानुमानानुसार राज्याच्या अर्थव्यवस्थेत ६.८ टक्के वाढ अपेक्षित आहे, तर देशाच्या अर्थव्यवस्थेत ७ टक्के वाढ अपेक्षित आहे.  राष्ट्रीय विकासदराच्या तुलनेत महाराष्ट्राचा विकासदर कमी आहे. सांकेतिक देशांतर्गत स्थूल उत्पन्नात राज्याचा सरासरी ह...
शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसाठी कोणते निकष लावणार?, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केली प्रक्रिया…
महाराष्ट्र, राजकारण

शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसाठी कोणते निकष लावणार?, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केली प्रक्रिया…

मुंबईः शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनीच घ्यावा, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर नेमका काय आणि कधी निर्णय घेणार? याकडे सबंध महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असतानाच लंडन दौऱ्याहून परतलेल्या नार्वेकरांनी आज या आमदारांच्या अपात्रतेबाबतची प्रक्रियाच स्पष्ट केली. जुलै २०२२ मध्ये शिवसेनेची स्थिती काय होती, राजकीय पक्ष कोण रिप्रेंझेट करत होते. यावर निर्णय घ्यावा लागेल आणि त्यानंतर त्या राजकीय पक्षाने प्रतोद म्हणून ज्याची नियुक्ती केली असेल त्याला मी मान्यता देईल, असे नार्वेकर म्हणाले. लंडन दौऱ्याहून परतल्यानंतर नार्वेकर यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेताना उशीर केला जाणार नाही. पण निर्णय घेण्याची घाई देखील केली जाणार नाही. पक्ष कोणाचा हे ठरवताना निवडणूक आयोगाला दोन-तीन महिने लागले आण...
डॉ. गणेश मंझांच्या ‘वेतन फसवेगिरी’ प्रकरणी कुलसचिवांकडून ठोस कारवाई नाही; आदेश ‘तत्काळ’ कारवाईचा, उलटला सव्वामहिना!
महाराष्ट्र, विशेष

डॉ. गणेश मंझांच्या ‘वेतन फसवेगिरी’ प्रकरणी कुलसचिवांकडून ठोस कारवाई नाही; आदेश ‘तत्काळ’ कारवाईचा, उलटला सव्वामहिना!

छत्रपती संभाजीनगरः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. गणेश मंझा यांची मूळ नियुक्ती शिक्षकेत्तर संवर्गातील उपकुलसचिवपदावर असतानाही त्यांनी फसवेगिरी करून शिक्षक संवर्गातील वेतनश्रेणी लागू करून घेऊन शासकीय तिजोरीची लूट केल्याप्रकरणी उच्च शिक्षण सहसंचालकांनी सुधारित वेतन निश्चिती करून देत त्यांना अतिप्रदान करण्यात आलेल्या रकमेच्या ‘तत्काळ’  वसुलीचे आदेश देऊन महिना उलटला तरी विद्यापीठ प्रशासनाकडून अद्याप कुठलीही ठोस कारवाई झाली नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासन डॉ. मंझा यांना पाठिशी तर घालत नाही ना? असा सवाल केला जात आहे. डॉ. गणेश मंझा यांची २८ जुलै २००८ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उपकुलसचिवपदावर नियुक्ती करण्यात आली. ते ५ सप्टेंबर २००९ रोजी विद्यापीठाच्या सेवेत रूजू झाले आणि त्यांना विद्यापीठाच्या उपक...
महिलादिनी आनंदाची बातमीः स्तनाच्या कर्करोगावर राज्य सरकार करणार मोफत उपचार, नोंदणी शुल्कही माफ!
जीवनशैली, महाराष्ट्र

महिलादिनी आनंदाची बातमीः स्तनाच्या कर्करोगावर राज्य सरकार करणार मोफत उपचार, नोंदणी शुल्कही माफ!

मुंबई: देशात प्रत्येक वर्षी स्तनाच्या कर्करोगाने ९० हजार महिलांचा मृत्यू होतो. दर सहा मिनिटाला एक मृत्यू, अशी या रोगाची चिंताजनक आकडेवारी आहे. स्तनाच्या कर्क रोगावरील सर्व उपचार राज्य सरकार मोफत करणार असल्याची घोषणा आज आंतरराष्ट्रीय महिलादिनी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केली. कोणत्याही रूग्णालयात महिलांना स्तन कर्करोगाच्या तपासासाठी नोंदणी शुल्क (केस पेपर फी) माफ करणार असल्याचेही महाजन यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय महिलादिनी कामा व आलब्लेस रूग्णालय येथे स्तनाच्या कर्क रोगाबाबत जनजागृती आणि उपचार अभियानाच्या शुभारंभप्रसंगी आयोजित कार्यक्रमात महाजन बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक दिलीप म्हैसेकर, सहसंचालक अजय चंदनवाले, रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे आदी उपस्थित होते. ...
१५ वर्षीय विद्यार्थ्याचे ३२ वर्षीय विवाहितेकडून लैंगिक शोषण, व्यसनीही बनवले; वाचा धक्कादायक कहाणी…
महाराष्ट्र, विशेष

१५ वर्षीय विद्यार्थ्याचे ३२ वर्षीय विवाहितेकडून लैंगिक शोषण, व्यसनीही बनवले; वाचा धक्कादायक कहाणी…

ठाणेः नाशिकमधील एका ३२ वर्षीय विवाहितेने एका १५ वर्षीय विद्यार्थ्याचे तब्बल चार वर्षांपासून लैंगिक शोषण करून त्याला दारू आणि अश्लील व्हिडीओ पाहण्याचे व्यसन लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित विद्यार्थ्याच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून कल्याणच्या कोळसेवाडी पोलिस ठाण्यात त्या विवाहित महिलेविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १५ वर्षीय पीडित विद्यार्थी कल्याणमधील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतो. त्याचे वडील कल्याण- डोंबिवली महापालिकेत नोकरी करतात. पीडित विद्यार्थ्याची आई गृहिणी आहे. घरात बहिणी आणि आजी आहे. पीडित विद्यार्थ्याची आत्या नाशिक येथे कुटुंबासह राहते. तेथे घराशेजारीच राहणारी तिची एक मानलेली मुलगी आहे. ती ३२ वर्षांची आहे. तिला दोन मुलेही आहेत.  पीडित विद्यार्थ्याची आत्या नाशिकहून आईला पाहण्यासाठी कल्याणला आली की तिच्यास...
श्रीक्षेत्र पंढरपूर यात्रेसाठी ५००० विशेष बसेस सोडणार, रिंगण सोहळ्यासाठी आणखी जादा गाड्या!
महाराष्ट्र

श्रीक्षेत्र पंढरपूर यात्रेसाठी ५००० विशेष बसेस सोडणार, रिंगण सोहळ्यासाठी आणखी जादा गाड्या!

मुंबई: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूरयात्रेकरिता वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने राज्यभरातून ५ हजार विशेष गाड्या सोडण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी येथे दिले. २५ जून  ते ०५ जुलै या दरम्यान या विशेष गाड्या धावणार असून वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी (२७ जून रोजी) २०० अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पंढरपूर आषाढी यात्रेसाठी एसटीने बससेवेसाठी केलेल्या नियोजनाचा आढावा मुख्यमंत्री शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत घेतला. यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्यासह महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते. पंढरपूर आषाढी यात्रा हा महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेचा जिव्हाळ्याचा विषय आहे. यामध्ये एसटीच्या प्रवाशी वाहतुकीला अनन्य साधारण महत्व आहे. याकाळात एसटीकडून आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा प्रवाशांन...
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा ‘संप’ संपला, सात दिवसांनंतर उद्यापासून कामावर!
महाराष्ट्र, विशेष

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा ‘संप’ संपला, सात दिवसांनंतर उद्यापासून कामावर!

मुंबई: जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप आज मागे घेतला. त्यामुळे तब्बल सात दिवसांनंतर सरकारी बाबू उद्या, मंगळवारपासून कामावर हजर होणार आहेत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे. कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत राज्य शासन पूर्णतः सकारात्मक असून याकरिता स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त करून त्यावर उचित निर्णय घेण्यात येईल, असे शिंदे यांनी विधानपरिषद आणि विधानसभेत निवेदनाद्वारे जाहीर केले.  राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना व सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी संघटनांच्या वतीने दिनांक १४ मार्च, २०२३ पासून सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. तसेच महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ यांच्या वतीने देखील दिनांक २८ मार्च, २०२३ पासून संपावर जाण्याबाबत रा...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!