मी दररोज दोन-तीन किलो शिव्या खातो आणि पचवतोहीः प्रधानमंत्री मोदींनी बोलून दाखवली मनातील वेदना
बागमपेठः मी दररोज दोन-तीन किलो शिव्या खातो... या शिव्याच माझ्यामध्ये ऊर्जेमध्ये बदलतात, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या मनातील ही सल तेलंगणातील एका रॅलीत बोलून दाखवली.
शनिवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील अनेक विकास प्रकल्पाचे भूमीपूजन आणि उद्घाटन केले. आधीच्या प्रमाणेच तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे प्रधानमंत्री मोदी यांच्या स्वागताला हजर राहिले नाहीत. मात्र आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री के. जगमोहन रेड्डी मोदींसोबत प्रत्येक कार्यक्रमात होते. त्यांनी मोदींचे स्वागतही केले. तेलंगणात लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार असून त्यासाठी भाजप पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरली आहे. त्यामुळे मोदींचे तेलंगणाचे दौरेही वाढले आहेत.
तेलंगणातील बागमपेठ येथे झालेल्या कार्यक्रमात मोदी म्हणाले की, अनेकवेळा लोक मला विच...