राजधानी दिल्लीत नाइट लाइफः ३०० पेक्षाजास्त आस्थापना २४ तास सुरू राहणार
नवी दिल्लीः मुंबईत नाइट लाइफ सुरू करण्याचे युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांचे स्वप्न राजधानी दिल्लीतही साकार होणार आहे. दिल्लीतील ३०० पेक्षा जास्त आस्थापना २४ तास सुरू ठेवता येणार आहेत. यामध्ये रेस्टॉरंट्सपासून मेडिकलची दुकाने, परिवहन सेवा, बीपीओ आणि ऑनलाइन डिलिव्हरीचा समावेश आहे. या श्रेणीतील दुकानांनी २४ तास सुरू ठेवण्याच्या परवानगीसाठी अर्ज केल्यानंतर त्यांना पुढील आठवड्यापासून परवानगी दिली जाणार आहे.
दिल्लीचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी ३१४ आस्थापनांना २४ तास सुरू ठेवण्याची सूट देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यामधील काही प्रस्ताव २०१६ पासून प्रलंबित होते. आता उपराज्यपालांनी दिलेल्या निर्देशांनुसार यासंबंधीची अधिसूचना सात दिवसांच्या आत जारी करावी. या निर्णयानंतर मोठ्या शहरांमध्ये प्रचलित असलेल्या ‘नाइट लाइफ’ संस्कृतीलाही चालना मिळणार असल्याचे मानले जात आहे. यामध्...



