विधिमंडळ वार्ताहर संघाचे पुरस्कार जाहीर: पंढरीनाथ सावंत यांना जीवनगौरव तर आचार्य, देशपांडे, भातुसेंना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार


मुंबईः मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सन २०२३ या वर्षीच्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारांची घोषणा आज मंत्रालयात करण्यात आली. ज्येष्ठ पत्रकार श्री. पंढरीनाथ सावंत यांना ‘कृ. पा. सामक’ हा प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.

उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारासाठी (मुद्रित) लोकसत्ता’चे प्रतिनिधी संदीप आचार्य यांची तर वाहिनीच्या (दृकश्राव्य) उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारासाठी सीएनएन न्यूज १८ च्या प्रतिनिधी विनया देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे. वार्ताहर संघाचा सदस्य पुरस्कार लोकमतचे दीपक भातुसे यांना जाहीर झाला आहे.

६ जानेवारी या पत्रकार दिनाचे औचित्य साधून आज या पुरस्कारांची घोषणा संघाचे उपाध्यक्ष महेश पवार आणि सरचिटणीस प्रवीण पुरो यांनी केली. ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे, मंदार पारकर, सदस्य सचिव खंडूराज गायकवाड यांच्या निवड समितीने या पत्रकारांच्या नावांची पुरस्कारासाठी केलेली शिफारस मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या कार्यकारिणीने मान्य केली.

सर्व पुरस्कार विजेत्यांचे मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *