मस्तवाल उपकुलसचिव विष्णू कऱ्हाळेविरुद्ध कुलगुरू काय कारवाई करणार? आज अहवाल अपेक्षित, ‘ते घडलेच नाही’ भासवण्याचा प्रयत्न


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यास कर्मचाऱ्यांना मज्जाव करणारा मस्तवाल उपकुलसचिव विष्णू कऱ्हाळेंविरुद्ध विद्यापीठ प्रशासन काय कारवाई करणार? याकडे आंबेडकरी समुदायाचे लक्ष लागले आहे. परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकांकडून आज ‘वस्तुस्थितीदर्शक’ अहवाल सादर होणे अपेक्षित असून त्यानंतरच कुलगुरू डॉ. प्र. गो. येवले हे या संवेदनशील प्रकरणात काय भूमिका घेतात, हे स्पष्ट होणार आहे.

६ डिसेंबर रोजी परीक्षा विभागाचा मस्तवाल उपकुलसचिव विष्णू कऱ्हाळे याने याच विभागातील कर्मचारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याची तयारी करत असताना त्यांना मज्जाव करत दमबाजी केली होती. हा प्रकार कळल्यानंतर विविध आंबेडकरी संघटना आणि विद्यार्थी संघटनांनी कुलगुरू डॉ. प्र.गो. येवले यांची भेट घेऊन जाब विचारला होता आणि कऱ्हाळेच्या निलंबनाची मागणी केली होती.

हेही वाचाः आरक्षण लाटणाऱ्या विष्णू कऱ्हाळेचे जातीयवादी फुत्कार,बाबासाहेबांना अभिवादन करण्यापासून परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांना रोखले!

कुलगुरू येवले यांनी चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिले खरे, परंतु एकूण घटनाक्रम पाहता विद्यापीठ प्रशासन विष्णू कऱ्हाळेची पाठराखण करण्याच्याच भूमिकेत असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

बुधवारी घडलेल्या या प्रकाराबद्दल विविध आंबेडकरी संघटना आणि विद्यार्थी संघटनांनी गुरूवारी कुलगुरू डॉ. प्र. गो. येवले यांची भेट घेऊन कऱ्हाळेला तत्काळ निलंबित करण्याची मागणी केली होती. त्यानंतर कुलगुरूंनी कऱ्हाळेला गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले होते. परंतु कऱ्हाळेने काही खुलासा सादर केला नाही. कऱ्हाळे गुरूवारी विद्यापीठात कर्तव्यावर आल्याची हजेरी नोंदवली, परंतु तो दिवसभर गायब होता.

हेही वाचाः उपकुलसचिव विष्णू कऱ्हाळेविरोधात आंबेडकरी संघटना आक्रमक, निलंबनाच्या मागणीसाठी विद्यापीठात ठिय्या आंदोलन

दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी ‘ड्रेनेज लाइन फुटल्या’चे कारण देत कऱ्हाळेने परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. भारती गवळी यांच्याकडे रजा मागितली. कऱ्हाळेवर अत्यंत संवेदनशील आरोप असताना आणि त्याबाबत खुलासा सादर करण्याचे आदेश कुलगुरूंनी देऊनही तो कऱ्हाळेने सादर केलेला नसताना गवळी यांनी कऱ्हाळेची रजा मंजूर करून टाकली.

आवश्य वाचाः आणखी एक ‘चारसौ बीसी’: पीएच.डी. विभागाचे उपकुलसचिव विष्णू कऱ्हाळेंनी बोगस कागदपत्रांच्या आधारे मिळवली विद्यापीठात नोकरी!

शुक्रवारी सकाळी कुलगुरू डॉ. प्र. गो. येवले यांनी परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले तेव्हा कऱ्हाळे आणि ज्यांना कऱ्हाळेने दमबाजी केली ते दोन्ही कर्मचारी रजेवर असल्याचे त्यांना समजले. त्यामुळे कुलगुरूंनी शुक्रवारी चौकशी केली नाही. नंतर त्यांनी परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. भारती गवळी यांना तीन दिवसांत ‘वस्तुस्थितीदर्शक’ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

हेही वाचाः पीएच.डी. विभागाचे उपकुलसचिव विष्णू कऱ्हाळेंकडून परीक्षा विभागातही ‘चारसौ बीसी’, दोन गुणाचे वाढवून केले २० गुण!

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यास मज्जाव करण्याचा गंभीर आरोप असलेल्या कऱ्हाळेला रजा मंजुरीचे संरक्षण देणाऱ्या डॉ. गवळींना कुलगुरूंनी दिलेली मुदत आज संपत आहे. त्यांच्याकडून आज सायंकाळपर्यंत अहवाल अपेक्षित आहे. त्यांच्याकडून अहवाल आल्यानंतरच कुलगुरू डॉ. प्र.गो. येवले कारवाईबाबतचा निर्णय घेतील.

हेही वाचाः परीक्षा विभागातील उपकुलसचिव विष्णू कऱ्हाळेंचे संस्थाचालकांशी साटेलोटे, ‘बिदागी’ म्हणून मिळवली पत्नीच्या नावाने आळंदला गॅस एजन्सी!

परंतु ‘६ डिसेंबर रोजी विद्यापीठात असे काही घडलेच नाही’ असे भासवण्याचा प्रयत्न मस्तवाल उपकुलसचिव विष्णू कऱ्हाळेकडून केला जात आहे. त्याच्या या प्रयत्नात विद्यापीठ प्रशासनाने हातभार लावल्यास कऱ्हाळेच्या विरोधात कारवाईची शक्यता शून्य आहे.

आवश्य वाचाः उपकुलसचिव विष्णू कऱ्हाळेंच्या ‘कृष्णकृत्यां’वर कुलगुरू डॉ. प्रमोद येवलेंकडूनही पांघरूण, तब्बल १० महिने उलटूनही कारवाई नाहीच!

दरम्यान, विद्यापीठ प्रशासनाने विष्णू कऱ्हाळेला तत्काळ निलंबित करून त्याच्या विभागीय चौकशीचे आदेश दिले नाही तर विविध आंबेडकरी संघटना आणि विद्यार्थी संघटना आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येते.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *