ऐन सणासुदीच्या तोंडावरच महागाईचा भडका, गॅस सिलिंडरच्या दरात २०९ रुपयांची वाढ


मुंबईः ऑक्टोबर महिन्याची सुरूवातच महागाईच्या दणक्याने झाली आहे. देशातील तेल कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ केली आहे. १९ किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात २०९ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्यात नवरात्रौत्सव आणि दसऱ्यासारखे महत्वाचे हिंदू सण आहेत. अशातच गॅस सिलिंडरच्या किंमती वाढवण्यात आल्यामुळे त्याचा नागरिकांवर मोठा परिणाम होणार आहे.

केंद्र सरकारने ३० ऑगस्ट रोजी १४.२ किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात २०० रुपयांनी तर व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात १५० ते १५७ रुपयांनी कपात केली होती. या दर कपातीमुळे घरगुती वापराचा गॅस सिलिंडर ११०३ रुपयांवरून ९०३ रुपये तर व्यावसायिक वापराचा गॅस सिलिंडर १६३५ रुपयांवरून १४८२ रुपयांवर आला होता. परंतु या दर कपातीचा आनंद फारकाळ टिकू शकला नाही.

तेल कंपन्यांनी केलेल्या दरवाढीमुळे व्यावसायिक वापराचा १९ किलोचा गॅस सिलिंडर आता नवी दिल्लीत १,७३१.५० रुपयांना झाला आहे. व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरसाठी आता कोलकोत्यात १,६३६ रुपये, चेन्नईत १,८९८ रुपये तर मुंबईत १,६८४ रुपये मोजावे लागणार आहेत.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!