मदरशात शिकणाऱ्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद, मोदी सरकारचा मोठा निर्णय


नवी दिल्लीः  मदरशामध्ये शिकणाऱ्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. उत्तर प्रदेशात मदरशात शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत दरमहा एक हजार रुपये आणि सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमानुसार शिष्यवृत्ती देण्यात येत होती. मात्र आता या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अर्जच भरण्यापासून रोखण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशातील १६ हजार ५५८ मदरशांमधून शिकणाऱ्या सुमारे पाच लाख विद्यार्थ्यांनी गेल्यावर्षी या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतला होता. आता मात्र इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे फक्त इयत्ता नववी आणि इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्ती देण्यात येणार असून त्यांचेच अर्ज मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहेत.

काय दिले कारण?:  केंद्र सरकारने मदरशामध्ये शिकणाऱ्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करण्यामागील कारणही दिले आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते. या मदरशांमध्ये मध्यान्ह भोजन आणि पुस्तकेही मोफत दिली जातात. विद्यार्थ्यांना इतर गरजेच्या गोष्टीही पुरवल्या जातात. यामुळेच या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करण्यात आली आहे, असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *