औरंगाबाद ‘स्मार्ट सिटी’च्या रस्त्याला तडेः मुंबई आयआयटीच्या पथकाने नेला तपासणीसाठी रस्त्याचा तुकडा!


औरंगाबादः स्मार्ट सिटीअंतर्गत तयार होत असलेल्या रस्त्यांना काही दिवसांतच भेगा पडल्या असून या रस्त्यांच्या तपासणीसाठी आयआयटी मुंबई तज्ज्ञांचे पथक शहरात आले आहे. या पथकाने सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी नोव्हेंबर रोजी शहरात विविध ठिकाणी रस्त्यांच्या कामांची पाहणी करत गुणवत्ता तपासली. यानंतर आता या पथकाने रस्त्यांची गुणवत्ता तपासणी थेट मुंबईच्या आयआयटी लॅबमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तयार झालेल्या रस्त्यावरील तुकडा घेऊन तो मुंबईच्या लॅबमध्ये नेला जाणार आहे.

औरंगाबाद स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात रस्त्यांची कामे केली जात आहेत. या कामांचे थर्ड पार्टी इन्स्पेक्शन मुंबईच्या आयआयटी पथकाकडून केले जात आहे. यासाठी मुंबईहून प्राध्यापक डॉ. धर्मवीर सिंग यांच्या नेतृत्वाखाली आयआयटी मुंबईचे पथक दोन दिवसांपासून शहरातील रस्तेकामांची पाहणी करत आहे. त्यांच्यासोबत स्मार्ट सिटीचे प्रकल्प व्यवस्थापक इम्रान खान, किरण आढे, कनिष्ठ अभियंता नेत्राप्रभा जाधव, प्रकल्प सल्लागार यश इनोव्हेशन सोल्यूशन्सचे फारुकी झफीर हे देखील उपस्थित होते. स्मार्ट सिटीतून ३१७ कोटींतील १०९ पैकी पहिल्या टप्प्यात शहरात २२ रस्ते तयार करण्यात येत आहे.

मंगळवारी दुपारी या पथकाने पडेगाव, माऊली मेडिकल ते भावसिंगपुरा कमान, एसबीओए, पिसादेवी, शिव छत्रपती महाविद्यालय ते हायकोर्ट आणि पारिजातनगर येथे तयार होत असलेल्या नवीन रस्त्यांची व रुंदीकरणाच्या कामाची पाहणी केली. त्यांनी सूचना दिली की, रोड आणि फुटपाथ तयार करण्याचे काम सोबतच हाती घेतले पाहिजे. जेणेकरून परत रोड खोदावे लागणार नाही. कन्स्ट्रक्शन जॉइंटसाठी एपॉक्सी ट्रीटमेंट करून करण्यात यावे, अशी ही सूचनाही त्यांनी केली.

तपासणीनंतर अहवाल देणार स्मार्ट सिटीलाः आयआयटी मुंबईच्या पथकाने तयार होत असलेल्या रस्त्याचा एक सँपल तुकडा काढलेला आहे. आता या नमुन्याची तपासणी आयआयटीच्या प्रयोगशाळेत केली जाणार आहे, असे डॉ. धर्मवीर सिंग यांनी सांगितले. झालेल्या पाहणी व तपासण्याची विस्तृत अभ्यास करून तज्ज्ञ औरंगाबाद स्मार्ट सिटीला अहवाल देणार आहे. ज्यानुसार कंत्रादारांकडून काम करून घेण्यात येईल, असे स्मार्ट सिटीच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

रोड मिक्स एका तासाच्या आत वापराः मंगळवारी सकाळी तज्ज्ञांचा पथकाने सर्वात आधी कांचनवाडी येथील रेडी मिक्स प्लांटला भेंट दिली. तिथे त्यांनी रस्ते बांधकाम साहित्याची तयार करण्याची प्रक्रिया तपासली. त्यांनी सूचना केली की, मिक्स तयार झाल्यानंतर एका तासाचा आत वापरलेले गेले पाहिजे. तर एका तासापेक्षा उशीराने आलेले रोड मिक्स नाकारले गेले पाहिले. तत्पूर्वी, या पथकाने सोमवारी नवीन रस्त्याचे सँपल क्यूब घेतले होते. त्या क्यूबला तोडून त्याची मजबुती तपासली. यावेळेस त्यांनी टेस्टिंग संबंधित कागदपत्रे सुद्धा तपासली. त्यातून कडक सूचना देखील कंत्राटदारासह अधिकार्‍यांना केल्या.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!