विद्यापीठाच्या वार्षिक क्रीडा बैठकीत शिवीगाळीचे ‘मुष्ठीयुद्ध’, महिला संघ व्यवस्थापकाने केला क्रीडा संचालकांचा मनसोक्त ‘सत्कार’!


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा विभागाच्या वतीने चालू शैक्षणिक वर्षासाठी आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक नियोजन बैठक आणि कार्यशाळेत आज शिवीगाळ आणि अरेरावीचे ‘मुष्ठीयुद्ध’ रंगलेले पहायला मिळाले. बॉक्सिंग क्रीडा प्रकारातील संघ महिला संघ व्यवस्थापकास मंचावर निमंत्रित करून त्यांचा सत्कार करण्याचे टाळल्यामुळे भडकलेल्या त्या संघ व्यवस्थापकाने प्रभारी क्रीडा संचालक डॉ. संदीप जगताप यांना शिविगाळ,अरेरावी करत आणि गचांडी पकडून त्यांचा मनसोक्त सत्कार केला. त्यामुळे या बैठकीतही पक्षपात केला गेला की काय? असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे.

विद्यापीठाच्या नाट्यगृहात आज (मंगळवारी) या वार्षिक नियोजन बैठक व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. क्रीडा व युवकसेवा संचालनालयाच्या सहसंचालक तसेच आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्स पदक विजेत्या खेळाडू भाग्यश्री बिले यांच्या हस्ते या बैठकीचे उद्घाटन झाले. यावेळी कुलगुरू डॉ. विजय फुलारी, प्र- कुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे, शारीरिक शिक्षण विभागप्रमुख डॉ. कल्पना झरीकर आणि प्रभारी क्रीडा संचालक डॉ. संदीप जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचाः प्रभारी क्रीडा संचालकांची मनमानी, नियम डावलून विद्यापीठाच्या हॉकी संघात खेळवले स्वतःच्याच महाविद्यालयाचे चार खेळाडू!

कार्यक्रमाच्या औपचारिक उद्घाटनानंतर क्रीडा क्षेत्रातील नावाजलेल्या व्यक्तिमत्वांबरोबरच मागील शैक्षणिक वर्षातील नैपुण्यप्राप्त खेळाडू, संघ प्रशिक्षक व संघ व्यवस्थापक यांना देखील रोख रक्कम, ब्लेझर व पारितोषक वितरित करून गौरव करण्यात आला. जवळपास १०९ खेळाडू, संघ प्रशिक्षक व संघ व्यवस्थापकांना मंचावर बोलावून सन्मान करण्याचे नियोजन होते. त्यापैकी १०८ जणांचा सन्मानाने गौरवही करण्यात आला.

परंतु चंदीगड-मोहाली येथे झालेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी संघ व्यवस्थापक म्हणून गेलेल्या विजयश्री बारगळ यांचा सत्कार करण्याचे अ(न)वधानाने राहून गेले. सर्वांचा सत्कार झाल्यानंतर मंचावरील उद्घोषकाने विजयश्री बारगळ यांचे नाव पुकारले. परंतु मंचावर येण्याऐवजी त्या नाट्यगृहाच्या बॅक स्टेजला आल्या आणि प्रभारी क्रीडा संचालक डॉ. संदीप जगताप यांना बोलावून घेतले.

हेही वाचाः आंतरविद्यापीठ हॉकी स्पर्धेत विद्यापीठाचा संघ बाद फेरीतच गारद, तरीही ‘उपविजेता’ ठरल्याच्या खोट्या बातम्या देऊन थोपटून घेतली पाठ!

डॉ. जगताप हे बॅक स्टेजला गेल्यानंतर तुम्ही माझा हेतुतः आणि जाणीवपूर्वक अपमान केल्याचा आरोप करत डॉ. जगताप यांना त्यांनी शिवीगाळ करायला सुरूवात केली. बारगळ यांनी सोबत एक व्यक्तीही आणली होती. त्या व्यक्तीची ओळख मात्र पटू शकली नाही. त्या व्यक्तीने डॉ. जगताप यांची गचांडी पकडली. या दोघांनीही मिळून डॉ. संदीप जगपात यांच्यावर अरेरावी आणि शिवीगाळ करत त्यांचा मनसोक्त ‘सत्कार’ केला.

सत्कारासाठी तुमचे नाव घ्यायचे अनवधानाने राहून गेले आहे. आता तुमचे नाव पुकारले आहे. त्यामुळे तुम्ही मंचावर येऊन सत्कार स्वीकारा, असे डॉ. संदीप जगपात यांनी विजयश्री बारगळ यांना सांगण्याचा प्रयत्न केला. उद्घोषिकेनेही माझ्याकडून तुमचे नाव राहून गेल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. मला ती यादी दाखवा, मला त्या यादीचा फोटो काढून घेऊ द्या, असे विजयश्री बारगळ उद्घोषिकेला म्हणाल्या. त्यांनी मात्र त्यास स्पष्ट नकार दिला.

हेही वाचाः विद्यापीठ ‘योगी बाबा’च्या वेगळ्याच’ क्रीडा’; योगवर्गात विद्यार्थिनींशी गैरवर्तन, ‘मी काय तुमचा नवरा आहे का?’ म्हणत अश्लील भाषेत पाणउतारा!

नाट्यगृहाच्या बॅक स्टेजला काहीतरी ड्रामा रंगल्याची खबर पाहता पाहता सभागृहात बसलेले विविध महाविद्यालयाचे क्रीडा संचालक, खेळाडू, संघ व्यवस्थापक आणि प्रशिक्षकांपर्यंत पोहोचली. त्यापैकी काही जण जागचे उठून बॅक स्टेजला चाललेल्या या ड्रामाचा कानोसाही घेऊन आले. त्यामुळे सभागृहात कानोकानी क्रीडा संचालकांचा महिला संघ व्यवस्थापकाने कशा शब्दांत ‘सत्कार’ केला याची रंगतदार चर्चा रंगली होती. एवढे सगळे होऊनही आपल्याला हेतुतः डावलून अपमान केल्याच्या आरोपावर त्या महिला संघ व्यवस्थापिका ठाम राहिल्या आणि मंचावर येऊन सत्कार स्वीकारण्याऐवजी बॅक स्टेजलाच प्रभारी क्रीडा संचालक डॉ. संदीप जगपात यांचा मनसोक्त ‘सत्कार’ करून निघून गेल्या.

हेही वाचाः धक्कादायक! विद्यापीठाच्या जलतरण तलावात अप्रशिक्षित भोंदू योगीबाबाच मुलींना द्यायचा पोहण्याचेही धडे, प्रशिक्षित कोच मात्र परागंदा!

कुलगुरूंनी आधीच टोचले होते कान

या बैठकीच्या उद्घाटनाच्या सत्रातच कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी प्रभारी क्रीडा संचालक डॉ. संदीप जगपात यांचे अप्रत्यक्षपणे कान टोचले होते. क्रीडा संचालक हे अतिउत्साही आहेत. ससा आणि कासवाच्या शर्यतीत ससा जोरात पळतो, पण शर्यत कासवच जिंकतो, हे लक्षात ठेवा, असा कानमंत्रच कुलगुरूंनी डॉ. जगताप यांना दिला होता. हा कानमंत्र डॉ. संदीप जगपात यांच्या कानात नीट पोहोचून साठवायलाही अवकाश की बॅक स्टेजवर हा ‘ड्रामा’ घडला.  आपल्या कार्यकाळात कोणत्याही खेळाडूवर अन्याय होणार नाही, यासाठी मी जातीने नजर ठेवून असणार आहे,असेही कुलगुरू डॉ. फुलारी म्हणाले होते.  या कार्यक्रमात झालेले अन्य गौरव असेः

उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय

मागील शैक्षणिक वर्षात खेळाडूंचा स्पर्धेतील सहभाग, गुणवत्तेच्या आधारावर गुणांकन देऊन उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देवगिरी महाविद्यालय व कन्नडचे शिवाजी महाविद्यालय, जालना जिह्यातील अंकुशराव टोपे महाविद्यालय, व मत्सोदरी महाविद्यालय, बीड जिह्यातील के. एस. के. महाविद्यालय, व ऍड. बी. डी. हंबर्डे महाविद्यालय, धाराशिव जिल्ह्यातील तेरणा महाविद्यालय, व नळदुर्ग येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांना सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

तलवारबाजीः चीन येथे झालेल्या जागतिक पातळीवरील आंतर विद्यापीठ स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल तालवारबाजी खेळातील तुषार अहेर, अभय शिंदे, स्वप्नील जहागीरदार, प्रशिक्षक डॉ. उदय डोंगरे यांचा गौरव करण्यात आला.

अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धा

तलवारबाजीः श्रेयस जाधव, संतोष बहुरे, दुर्गेश जहागीरदार, जयदीप पांढरे, निखील वाघ, प्रशिक्षक डॉ पांडुरंग रनमाल.

शूटिंगः अंजली वाघमोडे, तेजस्विनी कदम, मोहिनी काटूरे, वेदांत जाधव, प्रशिक्षक-डॉ. असमा परवीन.

जिम्नॅस्टिकः रिद्धी हत्तेकर, प्रशिक्षक संजय मोरे, व्यवस्थापक ऋत्विक भाले.

पॉवर लिफ्टिंगः वैभव थोरात, प्रशिक्षक डॉ .निलेश गाडेकर, वयवस्थापक प्रा.तुषार सपकाळे.

कुस्तीः सौरभ इगवे, प्रशिक्षक डॉ. मंगेश डोंगरे, वयवस्थापक रामेश्वर विधाते.

खो-खो (पुरुष): ऋषिकेश मुरचवडे, राहुल मंडळ, अनिकेत चेंडवांकर, आकाश साळवे, मनोज पाटील, संकेत कदम, विजय शिंदे, सोहम गुंड, रवी वसावे, सचिन पवार, सुरेश पवार, रुद्र थोपटे, नितीन इंगळे, राहुल नाईकनवरे, अविनाश बडवे, प्रशिक्षक डॉ. युसूफ पठाण, वयवस्थापक डॉ. कपिल सोनटक्के.

खो-खो (महिला संघ): तन्वी उभे, नम्रता गाडे, रुपाली वाघ, प्रीती काळे, स्नेहल जाधव, पूजा जाधव, संपदा मोरे, मयुरी पवार, किरण शिंदे, ऋतुजा खरे, गौरी शिंदे, जान्हवी पेठे, प्राची जतनुरे, अमृता माने, सुकन्या जाधव, प्रशिक्षक डॉ. रफिक शेख, व्यवस्थापक यास्मिन शेख.

पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धा

ऍथलेटिक्सः मुकुल भोईर, प्रशिक्षक सुरेंद्र मोदी.

बॉक्सिंगः अंजुमन शर्मा उस्मान अन्सारी, खुशी जाधव, प्रशिक्षक व्यवस्थापक डॉ. कृष्णा परभणे.

ताईक्वांदोः पारस गुरखुडे, प्रशिक्षक डॉ. रामदास जाधव, व्यवस्थापक श्रीमती लता कलवार.

कुस्तीः शुभम थोरात, रविराज निंबाळकर, शृंखला रत्नपारखी, वेदिका ससाणे, प्रशिक्षक डॉ. रामेश्वर विधाते, डॉ. मंगेश डोंगरे, व्यवस्थापक डॉ. ए. एम. कांबळे.

कबड्डी (पुरुष):  जावेद खान, सुरेश जाधव, कृष्णा पवार, अभिजित डागर, अक्षय सूर्यवंशी, रोहित बिन्नीवाले, अल्केश चव्हाण, तेजस काळभोर, भूषण तपकीर, आर्यवर्धन नवले, संदेश देशमुख, ऋषिकेश भोजने, प्रशिक्षक डॉ. साजिद चाऊस, डॉ. माणिक राठोड, व्यवस्थापक डॉ. भुजंग डावकर.

तलवारबाजीः हर्षदा वडते, ऋतुजा जाधव, व्यवस्थापक डॉ. ज्योती गायकवाड.

क्रीडा महोत्सव-२०२३

व्हॉलीबॉल (पुरुष): सय्यद जमीर, लक्ष्मण धोत्रे, सुमित म्हस्के, तुषार जाधव, प्रथमेश गंगाने, कौशिक शेलोटकर, सोहम मोरे, निवृत्ती पाटील, आदित्य माने, कमलेश जोगदंड, प्रशिक्षक अभिजित दिखात, व्यवस्थापक डॉ. महेशराजे निंबाळकर.

बास्केटबॉल (पुरुष): रुद्राक्ष पांडे, अभिषेक अंभोरे, अभिषेक खंदारे, नरेंद्र चौधरी, जयराज तिवारी, प्रदीप लाटे, साहिल धनवटे, शुभम लाटे, अझमत खान, प्रेम मिश्रा, प्रशिक्षक गणेश कड, व्यवस्थापक डॉ. अफसर शेख.

ऍथलेटिक्सः योगिनी साळुंके, सोनाली पवार, स्नेहा मदने, सुरेखा आडे, मुकुल भोईर, प्रशिक्षक डॉ. सीमादेवी मुंढे, डॉ. संतोष वनगुजरे, व्यवस्थापक आशिष शुक्ला.

कबड्डी (पुरुष): नारायण वैद्य, अभिजित गर्जे, सुदर्शन परदेशी, विकास जाधव, प्रसाद मगर, अलकेश राठोड, ऋतिक पाटील, सुशांत शिंदे, प्रशिक्षक डॉ. भुजंग डावकर, व्यवस्थापक डॉ. भागचंद सानप.

खेलो इंडिया आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धा

कबड्डी (पुरुष): जावेद खान, सुरेश जाधव, कृष्णा पवार, अभिजित डागर, सूर्यवंशी अक्षय, रोहित बिन्नीवाले, अलकेश चव्हाण, तेजस काळभोर, भूषण तपकीर, आर्यवर्धन नवले, संदेश देशमुख, ऋषिकेश भोजने, प्रशिक्षक डॉ. साजिद चाऊस, व्यवस्थापक डॉ. माणिक राठोड.

शूटिंग: अंजली वाघमोडे, तेजस्विनी कदम, मोहिनी कटुरे, वेदांत जाधव, प्रशिक्षक डॉ. संदीप जगताप.

तलवारबाजी: विशाल दानवे, श्रेयस जाधव, प्रशिक्षक स्वप्नील शेळके, व्यवस्थापक डॉ. उदय डोंगरे.

जुदो: शृंखला रत्नपारखी, प्रशिक्षक डॉ. बाप्पासाहेब म्हस्के.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!