मराठवाडा, विदर्भात पुढील चार दिवस पावसाचे, कुठे मुसळधार तर कुठे हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस!


मुंबईः येत्या काही दिवसात राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून पावसाची वाट पाहात असलेल्या विदर्भ- मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठीही हवामान विभागाने दिलासादायक बातमी दिली आहे. आजपासून पुढचे पाच दिवस मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यात मुसळधार ते हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असल्याचे मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने म्हटले आहे. २५ ते ३१ जुलैदरम्यान विदर्भ- मराठवाड्यात सरासरी इतका पाऊस राहण्याची शक्यता आहे.

शनिवारपासूनच राज्याच्या काही भागात पावसाचा जोर वाढला आहे. पुढील काही दिवस पावसाचा हा जोर आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. २४ जुलैदरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र नव्याने तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात पावसाच्या जोरदार सरी तर काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

भारतीय हवामान खात्याने पुढील चार दिवस कोकण किनारपट्टीसह विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही भागात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. संपूर्ण राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यातच आता हवामान खात्याने आणखी काही दिवस जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. अरबी समुद्रावर पावसाला पोषक वाऱ्यांचे प्रवाह सक्रीय झाले आहेत. त्यामुळे पुढील चार दिवस कोकण किनारपट्टी विदर्भ व मराठवाड्यात जोरदार पाऊस हजेरी लावणार आहे. तर काही भागांना तीव्र पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

अरबी समुद्रात पावसाला पोषक वाऱ्यांचे प्रवाह सक्रीय झाले आहेत. त्यामुळे पुढील चार दिवस कोकण किनारपट्टीसह विदर्भ व मराठवाड्यात जोरदार पाऊस हजेरी लावणार आहे. मराठवाड्यात धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचाः राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, माना टाकू लागलेल्या पिकांना मिळणार जीवदान; वाचा तुमच्या भागात कसे असेल पाऊसमान?

मंगळवार, २२ जुलै रोजी बीड, परभणी, हिंगोली व नांदेड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर शनिवार २६ जुलै रोजी जालना जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी ३० ते ४० कि.मी.) राहून मुसळधार पावसाची शक्यता आहे.

बुधवार, २३ जुलै व  गुरूवार, २५ जुलै रोजी नांदेड, परभणी, हिंगोली, जालना जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी ३० ते ४० कि.मी.) राहून मुसळधार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

मंगळवार, २२ जुलै रोजी जालना, छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, लातूर जिल्हयात तर शनिवार, २६ जुलै रोजी बीड, छत्रपती संभाजी नगर व परभणी जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 मराठवाडयात मंगळवार, २२ जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी तर २३, २५ व २६ जुलै रोजी काही ठिकाणी आणि २४ जुलै रोजी काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवसात कमाल तापमानात हळूहळू ३ ते ४ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. किमान तापमानात पुढील चार ते पाच दिवसात फारशी तफावत जाणवणार नाही, असे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राने मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राच्या हवाल्याने म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!