मुंबईः जून महिना संपत आला तरी महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात पावसाने जोर धरलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. अशातच मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाने दिलासा दायक बातमी दिली आहे. येत्या काही दिवसात महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागाला पुढील दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून तेथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भाच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्याच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो, असा अंदाज आहे.
रविवार, ३० जूनः पालघर, रायगड, रत्नागिरी, नंदूरबार, पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
मुंबई, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, नाशिक, सातारा, चंद्रपूर, गडचिरोली, जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
सोमवार, १ जुलैः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे.
पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, नंदूरबार, नाशिक, कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असून अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात विजांचा कडकडाटासह मेघगर्जनेची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या उर्वरित जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
मंगळवार, २ जुलैः ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात विजांचा कडकडाटासह मेघगर्जनेची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या उर्वरित जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
बुधवार, ३ जुलैः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात विजांचा कडकडाटासह मेघगर्जनेची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या उर्वरित जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
गुरूवार, ४ जुलैः ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाउस होईल, असा अंदाज आहे.