मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुढचे तीन दिवस तीन तासांचा ट्रॅफिक ब्लॉक, वाहतुकीत मोठे बदल


पुणेः मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहिनीवर गर्डर बसवण्यात येणार असल्यामुळे या द्रुतगती मार्गावर सोमवारपासून तीन दिवस तीन तासांचा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ चा वापर करावा लागणार आहे.

मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर घाटातील वळणरस्ते टाळण्यासाठी दरीवरील दोन पूल व दोन बोगद्यांवर मिसिंग लिंकच्या उभारणीचे काम सुरू आहे. या मिसिंग लिंकच्या बांधकामासाठी पुण्याकडे जाताना लोणावळ्याचा घाट उतरल्यानंतर डोंगरगाव-कुसगाव येथे स्थानिक वाहनांची ये-जा करण्यासाठी असलेला अंडरपास पाडण्यात आला होता. या मिसिंग लिंकच्या कामासाठी मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारा मार्ग कुसगावपासून २७ ते २९ जानेवारीदरम्यान दररोज दुपारी १२ वाजेपासून ३ वाजेपर्यंत तीन तास बंद राहणार आहे.

या ट्रॅफिक ब्लॉकच्या कालावधीत मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना हा द्रुतगती मार्ग सोडून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरून म्हणजेच जुना मुंबई-पुणे महामार्गावरून वरसोलीच्या दिशेने जावे लागेल.

२७ ते २९ जानेवारीदरम्यानच्या ट्रॅफिक ब्लॉकमध्ये मुंबई- पुणे महामार्गावर मिसिंग लिंकवर गर्डर बसवण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यात पुणे- मुंबई मार्गावर गर्डर बसवण्यात आला होता. त्यामुळे पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक मळवलीजवळ रस्ता दुभाजक उघडून सात किलोमीटर उलट दिशेने वळवण्यात आली होती. तेव्हाही पुणे-मुंबई मार्गावर ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आला होता. आता मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!