पावसाचे कमबॅक: मराठवाड्यात आज मेघगर्जनेसह पाऊस, विदर्भ-उत्तर महाराष्ट्रात उद्यापर्यंत जोर’धार’!
मुंबई: दहीहंडीच्या मुहूर्तावर राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रीय झाला आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला थोडासा दिलासा मिळाला आहे. पुढील दोन दिवस राज्याच्या बहुतांश भागात पाऊसधारा बरसण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मराठवाड्यात आज शुक्रवारी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर उत्तर कोकण, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात उद्या शनिवारपर्यंत (९ सप्टेंबर) पावसाचा जोर कायम राहील, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
ओडिशा आणि छत्तीसगडमध्ये निर्माण झालेली चक्रीय वाऱ्याची स्थिती, पूर्व-पश्चिम कमी दाबाचा पट्टा, अरबी समुद्रावरून येणारे वारे आणि मान्सूनचा आस मूळस्थितीपासून दक्षिणेकडे सरकल्यामुळे या स्थितीचा फायदा महाराष्ट्राला होत आहे.
या परिस्थितीमुळे उत्तर कोकण, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात शनिवार, ९ सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात आज शुक्रवारी मेघग...