Tag: water supply

हिंगणा तालुक्यातील इसासनी, निलडोह, डिगडोह पाणी पुरवठा योजनेला मार्च महिन्यापर्यंत मुदतवाढ
महाराष्ट्र

हिंगणा तालुक्यातील इसासनी, निलडोह, डिगडोह पाणी पुरवठा योजनेला मार्च महिन्यापर्यंत मुदतवाढ

नागपूर: राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा तालुक्यातील इसासनी-वागधरा तसेच निलडोह-डिगडोह पाणी पुरवठा योजनेची कामे डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजित आहे. तथापि या कामांची अंतिम टप्प्यातील उर्वरित कामे पाहता या कामांना मार्च महिन्यापर्यंत मुदतवाढ देण्यात येईल, ही कामे पूर्ण न झाल्यास कंत्राटदारास काळ्या यादीत टाकण्यात येईल, असे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत सांगितले. आमदार समीर मेघे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. इसासनी-वागधरा योजनेला २८ डिसेंबर २०१८ रोजी तर निलडोह-डिगडोह पाणी पुरवठा योजनेला ४ फेब्रुवारी २०१९ रोजी मान्यता देण्यात येऊन १७ सप्टेंबर २०१९ रोजी कामाचे कार्यादेश देण्यात आले होते, असे पाटील म्हणाले.  या योजनांचा मूळ कालावधी १८ महिन्यांचा होता. तथापि, कोविड-१९ च्या प्रादूर्भावामुळे कामे...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!