मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी उमेदवारांसाठी रोजगाराभिमुख मोफत कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी प्रवेश सुरु
मुंबई: छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे आणि एमएसएमई टेक्नॉलॉजी सेंटर - इंडो जर्मन टूल रूम (आयजीटीआर), अंतर्गत देण्यात येणाऱ्या कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी पुढील तुकडीमध्ये प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी समाजाच्या दहावी,बारावी, आयटीआय, डिप्लोमा/डिग्री (इंजिनियरिंग) झालेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असून त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सारथी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी सारथी संस्थेच्या https://sarthi-maharashtragov.in या संकेतस्थळास भेट द्यावी. तसेच, जाहिरात व प्रवेश प्रक्रियेसाठी आयजीटीआर या संस्थेच्या www.igtr-aur.org या संकेतस्थळावर भेट देवून आपला प्रवेश निश्चित करावा.
सारथी व आयजीटीआर अतंर्गत छत्रप...