Tag: rajyasabya election 2024

चंद्रकात हांडोरे यांना काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी, सोनिया गांधी राजस्थानातून लढवणार राज्यसभा निवडणूक
देश, राजकारण

चंद्रकात हांडोरे यांना काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी, सोनिया गांधी राजस्थानातून लढवणार राज्यसभा निवडणूक

नवी दिल्ली: काँग्रेसने राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली असून महाराष्ट्रातून चंद्रकांत हांडोरे यांना संधी देण्यात आली आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभा निवडणूक लढवणार आहेत. महाराष्ट्रातील सहा जागांसाठी राज्यसभेची निवडणूक होत आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेतील संख्याबळाचा विचार करता भाजपकडून ३, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून १,अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून १ आणि काँग्रेसकडून १ उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतात. त्यासाठी काँग्रेसने चंद्रकांत हांडोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. जून २०२३ मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीतही काँग्रेसने चंद्रकांत हांडोरे यांना उमेदवारी दिली होती, मात्र काँग्रेसची मते फुटल्यामुळे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. परंतु हांडोरे यांनी पक्षावर विश्वास ठेवल्यामुळे काँग्रेसने त्यांना पुन्हा एकदा संधी...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!