पीएच.डी. करून काय दिवे लावणार? म्हणणाऱ्या अजित पवारांचा चप्पल, बुटावर फोटो चिटकवून निषेध
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी केलेल्या 'पीएचडी करून करून काय दिवे लावणार?’ या वक्तव्याचे पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात गुरूवारी विविध विद्यार्थी संघटना आणि संशोधक छात्रांनी चप्पल, बुटावर फोटो चिटकवून अजित पवारांचा निषेध केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वक्तव्य हे संशोधक विद्यार्थ्यांचे खच्चीकरण करणारे असून या वक्तव्यातून अजित पवार यांनी स्वतःचे अज्ञान स्पष्ट केले आहे. अजित पवार हे अर्थ खात्याच्या माध्यमातून बहुजनांचे खच्चीकरण करत आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या पैशात तरी घोटाळा करू नये अशा भावना संशोधक विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.
अजित पवार हे भ्रष्ट, विश्वासघाती आहेत. त्यांनी पैसा व सत्ता मिळवण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष फोडल्याचा देखील आरोप आंदोल...

