Tag: nanded medical college hospital deaths

नांदेडच्या सरकारी रुग्णालयातील रूग्ण मृत्यूप्रकरणी अधिष्ठातांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, बालरोग विभागाचे डॉक्टरही आरोपी
महाराष्ट्र

नांदेडच्या सरकारी रुग्णालयातील रूग्ण मृत्यूप्रकरणी अधिष्ठातांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, बालरोग विभागाचे डॉक्टरही आरोपी

नांदेड: राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात झालेल्या रुग्णाच्या मृत्यूला जबाबदार धरून या रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शामराव वाकोडे यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा दाखल झालेल्या गुन्ह्यात बालरोग विभागाच्या डॉक्टरांनाही आरोपी करण्यात आले आहे. मराठवाड्यातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे सरकारी रुग्णालय असलेल्या नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात अपुरे मनुष्यबळ आणि औषधांचा तुटवडा यामुळे ४१ रुग्णांचा मृत्यू झाला. या प्रकरणी राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता याच प्रकरणात रुग्णालयाचे अधिष्ठाताच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. लोहा तालुक्यातील अंजली वाघमारे या गरोदर महिल...