मनोज जरांगेंच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली, जरांगे मात्र ठाम
मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लाखो मराठा समाज बांधवांचा जत्था घेऊन मुंबईच्या दिशेने निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. असे असले तरी मनोज जरांगे हे आझाद मैदानावर येऊन आंदोलन करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत.
मुंबईतील आझाद मैदान हे आंदोलनासाठीच राखीव आहे. परंतु मनोज जरांगे हे लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधवाना घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. आझाद मैदानाची इतकी क्षमता नसल्याचे कारण देत मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मुंबई पोलिसांनी जरांगे यांना उपोषणासाठी पर्यायी जागाही सुचवली आहे. नवी मुंबईतील खारघर येथील सेक्टर २९ मधील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्कच्या मैदानावर उपोषण करावे, असे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.
ज्याअर्थी आपण लाखोंच्या संख्येने आंदोलक आणि वाहनांसह मुंबईत येणार असल्याचे घोषित केले आहे, त्यामुळे मुंबईत...