मराठ्यांसाठी राज्य सरकारने काढला जीआर, पण जरंगे पाटील ‘सरसकट’वर अडले; उपोषणाबाबत केली ‘ही’ घोषणा
मुंबई/जालना: निजाम कालीन महसुली अभिलेखात किंवा शैक्षणिक अभिलेखात नोंदी असलेल्या मराठवाड्यातील मराठा समाजाला मराठा-कुणबी, कुणबी मराठा जात प्रमाणत्रे जारी करण्याची विहित प्रक्रिया निश्चित करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याबाबतचा तीन पानी शासन निर्णय आज जारी करण्यात आला आणि आंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करणारे पत्र राज्य सरकारने दिले; परंतु या जीआरमध्ये 'सरसकट मराठा समाजाला' अशी दुरूस्ती करावी या मागणीसाठी जरांगे पाटील आडून बसले असून त्यांनी उपोषण सुरूच ठेवण्याची घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निजाम कालीन महसुली अभिलेखात किंवा शैक्षणिक अभिलेखात नोंदी असलेल्या मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी-मराठा आणि मराठा कुणबी जातीची प्रमाणपत्रे देण्याबाबत कार्...