Tag: maratha reservation kunbi cabinet decision

नोंदी असणाऱ्यांना लगेच कुणबी प्रमाणपत्र देणार, मराठा समाजाचा नव्याने इम्पेरिकल डाटा गोळा करणार; मंत्रिमंडळाचा निर्णय
महाराष्ट्र, राजकारण

नोंदी असणाऱ्यांना लगेच कुणबी प्रमाणपत्र देणार, मराठा समाजाचा नव्याने इम्पेरिकल डाटा गोळा करणार; मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई: मराठा आरक्षणावरून महाराष्ट्राचे वातावरण तापलेले असतानाच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मराठा समाजासाठी महत्वाचे निर्णय घेण्यात आले. कुणबी नोंदी असलेल्यांना लगेचच कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करण्याचा आणि मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी नव्याने इम्पेरिकल डाटा गोळा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मराठवाड्यातील निझामकालीन व इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा -कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल आज राज्य मंत्रिमंडळाने स्वीकृत केला. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या अहवालामध्ये निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीने नमूद केल्याप्रमाणे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील सुमारे पावणेदोन कोटी नोंदी तपासण्यात आल्या असून १३ हजार ४९...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!