मुख्यमंत्री शिंदेंसह १६ आमदारांच्या अपात्रेचा फैसला कधी? सुप्रीम कोर्टाची विधानसभाध्यक्ष नार्वेकरांना नोटीस, दोन आठवडे मुदत
नवी दिल्ली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकर निर्णय येण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.१६ आमदारांच्या अपात्रतेबाबत सध्या कोणती प्रक्रिया सुरू आहे? अशी विचारणा करत सर्वोच्च न्यायालयाने आज विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांना नोटीस बजावली असून या नोटिसीवर उत्तर देण्यासाठी त्यांना दोन आठवडे मुदत देण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासह १६ शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकर निर्णय घेण्याचे आदेश महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांना द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर पहिली सुनावणी आज झाली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांना दोन आठवड्यात आपली बाजू मांडावी लागणार आहे. सर्व...