प्रकाश आंबेडकरांना अटक करा, नारायण राणेची खळबळजनक मागणी; म्हणाले राजकीयदृष्ट्या संपलेले लोक…
प्रकाश आंबेडकरांना अटक करा, नारायण राणेची खळबळजनक मागणी; म्हणाले राजकीयदृष्ट्या संपलेले लोक...
पुणेः भाजपचे राज्यसभा खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर एफआयआर दाखल करून अटक करावी, अशी मागणी केली आहे. राजकीयदृष्ट्या संपलेले लोक का बोलतात? त्यांनी घरी बसावे, असेही राणे म्हणाले. राणे यांच्या या मागणीवरून आता वाद होण्याची शक्यता आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणतात राज्यात दंगली होऊ शकतात. त्यांनी तारीखही दिली आहे की तीन ते दहा डिसेंबर या कालावधीत असे काही होऊ शकते. खरेच राज्यात अशी परिस्थिती आहे का? पोलिसांना तसा अलर्ट दिला काय? असा प्रश्न पत्रकारांनी राणे यांना विचारला.
पत्रकारांच्या या प्रश्नावर राणे म्हणाले, त्यांच्यावर (प्रकाश आंबेडकर) एफआयआर दाखल करून त्यांना अटक व्हायला पाहिजे. कोणी माहिती जर लपवत असेल तर तो क्राईम ...