दिवसाआड पाणी मिळेल का? माहीत नाही, पण संभाजीनगरात उभारणार पाच नवीन प्रवेशद्वार; मंत्रिमंडळ बैठकीसमोर मनपाचा प्रस्ताव
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): सध्या छत्रपती संभाजीनगरला (औरंगाबाद) सहा दिवसातून एकदा मिळणारे पाणी किमान दिवसाआड तरी मिळावे अशी शहरवासियांची गेल्या कित्येक वर्षांपासूनची मागणी आहे. ही मागणी कधी पूर्ण होणार? शहरवासियांना वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात कधी पाणी मिळणार? याचे ठोस उत्तर कोणालाच माहीत नाही. पण तहानलेल्या शहरात पाच नवीन प्रवेशद्वार उभारण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रस्ताव असून मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त शहरात होऊ घातलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रस्ताव मांडला जाणार आहे. हा प्रस्ताव मंत्रिमंडळाने मंजूर केला तर तहानलेल्या शहरवासियांच्या पाण्याची दीर्घकालीन समस्या चुटकी सरशी सुटेल, अशी प्रशासनाची धारणा तर नाही ना? हे मात्र समजू शकले नाही.
मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाच्या निमित्ताने येथे होत असलेल्या मंत्रिमंडळ बैठ...

