Tag: magel tyala shet tale farmer farm lake

विदर्भ, मराठवाड्यासह कोकणातही ‘मागेल त्याला शेततळे’ योजना अधिक व्यापक करणार!
महाराष्ट्र

विदर्भ, मराठवाड्यासह कोकणातही ‘मागेल त्याला शेततळे’ योजना अधिक व्यापक करणार!

नागपूर: ‘मागेल त्याला शेततळे’ ही कृषी विभागाची महत्त्वाकांक्षी योजना असून, अवर्षणग्रस्त भागातील शेतकऱ्यांना याचा अधिक लाभ मिळावा यादृष्टीने विदर्भ, मराठवाड्यासह कोकणात देखील या योजनेला अधिक व्यापक स्वरूप देण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना दिली.  'मागेल त्याला शेततळे' योजनेतील प्रलंबित व रद्द झालेल्या अर्जाबाबत लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी प्रश्न उपस्थित केला होता.  शेततळे मंजूर करण्याची कार्यवाही जरी कृषी विभाग करत असला तरी ती राबवण्याची जबाबदारी रोजगार हमी विभाग पार पाडतो.  त्यामुळे दोन्ही विभागांचा समन्वय साधून प्रत्येक पात्र लाभार्थ्याला लाभ देण्यासाठी दोन्ही विभागांच्या समन्वयातून अधिक व्यापक स्वरूप दिले जाईल, असेही मुंडे म्हणाले.  कोकण क्षेत्रात जमिनी व भौगोलिक परिस्थिती थोड्या-...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!