Tag: khultabad APMC Lasur APMC

खुलताबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लासूर ‘कृऊबा’मध्ये विलिनीकरणास अंतरिम स्थगिती
महाराष्ट्र

खुलताबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लासूर ‘कृऊबा’मध्ये विलिनीकरणास अंतरिम स्थगिती

नागपूरः छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद कृषी उत्पन्न बाजार समितीचे लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विलिनीकरण करण्याच्या जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या आदेशास पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी अंतरिम स्थगिती दिली आहे. याप्रकरणी अंतिम निर्णय होईपर्यंत ही स्थगिती कायम राहणार आहे. छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी खुलताबाद कृषी उत्पन्न बाजार समितीचे लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीत विलिनीकरण करण्याची अधिसूचना १३ ऑक्टोबर २०२३ रोजी जारी केली होती. या अधिसूचनेला गंगापूर तालुक्यातील काटेपिंपळगाव येथील अनिल राजाराम चव्हाण आणि माळीवडगाव येथील शेषराव भाऊराव जाधव यांनी महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन ( विकास व विनियमन) अधिनियम १९६३ च्या कलम ४४ मधील तरतुदींनुसार पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे अपील दाखल केले होते. या अपिलात जिल्हा उपनिबंधक सहकारी स...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!