Tag: health asha swayamsevika gat pravartak

आशा स्वयंसेविकांच्या मानधनात ७ हजार रुपये तर गट प्रवर्तकांच्या मानधनात ६ हजार २०० रुपये वाढ;  बोनसही मिळणार
महाराष्ट्र

आशा स्वयंसेविकांच्या मानधनात ७ हजार रुपये तर गट प्रवर्तकांच्या मानधनात ६ हजार २०० रुपये वाढ;  बोनसही मिळणार

मुंबई: राज्यात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेअंतर्गत ८० हजारांपेक्षा अधिक आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. या आशा स्वयंसेविकांना ७ हजार रुपये मानधन वाढ, ३ हजार ६६४ गट प्रवर्तकांना प्रत्येकी ६ हजार २०० रुपये मानधन वाढ आणि आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांना प्रत्येकी २ हजार रुपये दिवाळी बोनस देण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज जाहीर केले. आरोग्य भवन येथे आशा स्वयंसेविका, संघटनांचे  प्रतिनिधी समवेत आयोजित बैठकीत डॉ. सावंत यांनी ही घोषणा केली. या बैठकीला आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर,आरोग्य सेवा आयुक्त धीरजकुमार, सहसंचालक सुभाष बोरकर, यांच्यासह आरोग्य विभागातील प्रमुख अधिकारी  उपस्थित होते. राज्यात सन २००७ पासून राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आशा योजनेची अंमलबजावणी सुरु आहे. सद्य:स्थितीत राज्यात ८० हजारावर आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत...