Tag: developed india @2047 PM Modi

प्रधानमंत्री मोदींच्या ‘विकसित भारत’ संवादासाठी विद्यापीठ, महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापकांना उपस्थितीची सक्ती
देश

प्रधानमंत्री मोदींच्या ‘विकसित भारत’ संवादासाठी विद्यापीठ, महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापकांना उपस्थितीची सक्ती

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे ११ डिसेंबर रोजी ‘विकसित भारत-२०४७’ या विषयावर देभरातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील विद्यार्थी, प्राध्यापकांना संबोधित करणार असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने विद्यार्थी-प्राध्यापकांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची सक्ती केली आहे. या सक्तीवरून आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे ११ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता ‘विकसित भारत-२०४७’ या विषयावर देशातील विद्यापीठे आणि महाविद्यालयातील विद्यार्थी-प्राध्यापकांना ऑनलाइन संबोधित करणार आहेत. त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात खास व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाने ८ डिसेंबर रोजी एक परिपत्रक जारी करून या कार्यक्रमाला विद्यापीठातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना उपस्थित राह...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!