महाराष्ट्रात १९१ वेठबिगार कामगारांची मुक्तता, सर्वाधिक वेठबिगार कातकरी समाजातील!
मुंबई: राज्यात जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२३ या कालावधीमध्ये राज्यातील एकूण १९१ वेठबिगारांची मुक्तता करण्यात आली असून त्यातील १०४ वेठबिगार हे कातकरी समाजातील होते.
राज्यात वेठबिगारी निर्मुलनासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत असून यात जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्यांची स्थापना, कॉर्पस फंड आणि अडचणीत सापडलेल्या वेठबिगारांच्या मुक्तेतेसोबतच त्यांना तातडिची आर्थिक मदत देण्यात येत आहे.
शासन अधिसूचना दि.१७/०६/२००२ व दि.०५/०८/२००८ अन्वये वेठबिगार अधिनियम १९७६ च्या अंमलबजावणीकरिता राज्यामध्ये ३२ जिल्हा दक्षता समित्या स्थापन केल्या असून उप विभागीय स्तरावर एकूण १२४ उप विभागीय दक्षता समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत.
या दक्षता समित्यांचे जिल्हाधिकारी अध्यक्ष असून उप विभागीय दक्षता समित्यांचे विभागीय अधिकारी अध्यक्ष आहेत. सदर दक्षता समित्य...