Tag: bharat Jodo Yatra Rahul Gandhi

चार-दोन उद्योगपतींनी देश ओरबाडायचा असा हिंदुस्तान होऊ देणार नाही: राहुल गांधी
देश, राजकारण

चार-दोन उद्योगपतींनी देश ओरबाडायचा असा हिंदुस्तान होऊ देणार नाही: राहुल गांधी

शेगाव: दोन-तीन उद्योगपतींनी देशाचा सर्वच्या सर्व पैसा ओरबाडायचा आणि देशातील युवांच्या स्वप्नांचा चुराडा करायचा, असा हिंदुस्तान आम्हाला नको आहे. असा हिंदुस्तान आमचा नाही आणि असा हिंदुस्तान आम्ही बनूही देणार नाही, असा विश्वास काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिला. राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रा आज शेगावमध्ये पोहोचली. या यात्रेदरम्यानची महाराष्ट्रातील शेवटची सभा शेगावमध्ये झाली. त्यावेळी राहुल गांधी बोलत होते. महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराज, म. फुले, शाहू महाराज, संत ज्ञानेश्वर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमी आहे. यापैकी कोणीही द्वेष, हिंसा,तिरस्काराची भाषा केली नाही. त्यांनी प्रेमाचा, लोकांना जोडण्याचाच संदेश दिला. द्वेष, हिंसा, तिरस्कारामुळे कोणाचा फायदा झाला काय? असा सवालही राहुल गांधी यांनी उपस्थितांना विचारला. यात्राची गरज काय? या यात्रेचा फायदा काय? असे सव...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!