अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी ‘या’ पाच जणांत रस्सीखेच, २० जानेवारीला राजभवनात मुलाखती
मुंबई: अमरावती येथील संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया सध्या सुरू असून कुलपती तथा राज्यपालांनी स्थापन केलेल्या कुलगुरू शोध समितीने ४३ जणांच्या मुलाखती घेतल्यानंतर ‘टॉप फाईव्ह’ उमेदवारांची नावे बंद लिफाफ्यात कुलपतींकडे पाठवली आहेत. कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस हे येत्या २० जानेवारीला राजभवनात या पाच जणांच्या मुलाखती घेणार आहेत.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी प्राप्त झालेल्या अर्जातून कुलगुरू शोध समितीने ४३ जणांची नावे शॉर्टलिस्ट केली होती. या शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांशी शोध समितीने मुंबईत ११ आणि १२ जानेवारी असे दोन दिवस संवाद साधला आणि त्यांच्याकडून विद्यापीठ विकासाचे व्हिजन जाणून घेतले.
कुलगुरूपदाच्या शर्यतीत उतलेल्या या ४३ जणांचे व्हिजन जाणून घेतल्यानंतर कुलगुरू शोध समितीने या ४३ मधून पाच जणांची नावे बंद लिफाफ्यात राज्यपा...