Tag: ameen sayani

रेडिओवरचा प्रसिद्ध शैलीदार आवाज हरपला, ज्येष्ठ निवेदक अमीन सायानी यांचे निधन
देश

रेडिओवरचा प्रसिद्ध शैलीदार आवाज हरपला, ज्येष्ठ निवेदक अमीन सायानी यांचे निधन

मुंबई: आपल्या शैलीदार आणि रसाळ निवेदनामुळे जगभरातील संगीतप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनलेले प्रसिद्ध रेडिओ निवेदक अमीन सायानी यांचे मंगळवारी रात्री ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. गुरूवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. बहनों और भाईयों, अगले पायदान पर है ये गाना…असे म्हणत अनेक वर्षे रेडिओवर बिना का गीतमाला हा कार्यक्रम सादर केला. मनाचा ठाव घेणाऱ्या शैलीदार आणि रसाळ निवेदनामुळे ते जगभरातील संगीतप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनले. रेडिओ सिलोन आणि विविध भारतीवर १९५२ ते १९९४ एवढा प्रदीर्घकाळ चाललेला सर्वाधिक लोकप्रिय रेडिओ कार्यक्रम म्हणून बिना का गीतमाला कार्यक्रमाची नोंद आहे.  जवळपास ४२ वर्षे रेडिओवर हा कार्यक्रम तुफान लोकप्रिय ठरला. नंतर २००० ते २००१ आणि २००१ ते २००३ दरम्यान त्यात काही बदल करून हा कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात आला होता. आवाजाचा अनभिषिक...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!