फेरछानणीनंतर दुष्काळी भागातील ४९ हजार ९९९ विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कमाफीचा निर्णय


मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे आतापर्यंत ५३,४२९ विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीचा लाभ देण्यात आला आहे. छानणीमध्ये नाकारल्या गेलेल्या सुमारे ४९,९९९ विद्यार्थ्यांच्या तक्रारींवरही फेरछाननी करून परीक्षा शुल्क माफीबाबतचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरूवारी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीबाबत विधान परिषद सदस्य विक्रम काळे यांनी प्रश्न विचारला होता, त्यास उत्तर देताना पाटील यांनी माहिती दिली. दुष्काळ घोषित झाल्यानंतर एकूण १२ प्रकारच्या सवलतीं देण्यात येतात. यात विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीचा समावेश आहे, असे पाटील म्हणाले.

 बऱ्याच वेळा हे फॉर्म विविध कारणांमुळे नाकारले जातात. यात विद्यार्थ्यांच्या क्षेत्राचा दुष्काळग्रस्त महसूल मंडळामध्ये समावेश नसणे, हे प्रमुख कारण असते. जे विद्यार्थी रिपीटर असतात, त्यांचे फॉर्म तसेच नाकारले जाण्याची शक्यता असते. याशिवाय, काही विद्यार्थी इतर शासकीय सुविधांचा लाभ घेत असल्यास, त्यांचे अर्जही रद्द होत असल्याचे पाटील यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!