भोकर येथील ज्येष्ठ पत्रकार बाबुराव पाटील यांना यंदाचा ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार’ जाहीर


भोकर:  मागील तीस वर्षांपासून आपल्या दमदार लेखनीतून सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक आणि उपेक्षितत घटकांना न्याय मिळवून देत विधायक आणि लोकाभिमुख पत्रकारिता करणारे भोकर येथील जेष्ठ पत्रकार बाबुराव पाटील यांना यंदाचा सकाळ वृत्तपत्र समूहाचा ‘उत्कृष्ट पत्रकारिता’ पुरस्कार जाहीर झाला आहे. सकाळच्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) आवृत्तीच्या वर्धापनदिनी, येत्या १ जून रोजी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

बाबुराव पाटील हे वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी विविध वृत्तपत्रात काम करून वेगळी ओळख निर्माण केली आणि केवळ भोकर तालुक्याच्यात नव्हे तर नांदेड जिल्ह्याच्या पत्रकारितेत आपला वेगळा ठसा उमटवला आहे. बाबुराव पाटील यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील उपेक्षित वंचित घटकांना न्याय मिळवून दिला आहे.

यापूर्वी त्याच्या लिखानाची दखल घेवून राज्यस्तरीय, मराठवाडास्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय आणि विविध सामाजिक संस्थानी पुरस्कार देवून गौरव केला आहे. ते मागील तीस वर्षांपासून पासून ‘सकाळ’चे भोकर तालुका बातमीदार म्हणून कार्यरत आहेत. दरम्यानच्या काळात त्यांनी बातम्यांच्या माध्यमातून दर्जेदार आणि परिणामकारक लिखाण करून वेगळी छाप निर्माण केली आहे.

बाबुराव पाटील यांनी गेली ३० वर्षे पत्रकारितेत दिलेल्या योगदानाची दखल घेऊन सकाळने त्यांची यंदाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठी निवड केली आहे. येत्या १ जून रोजी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे सकाळच्या रौप्यमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील संत एकनाथ नाट्यमंदिरात सायंकाळी आठ वाजता होणाऱ्या कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. सकाळच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाल्यामुळे बाबुराव पाटील यांचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!