नवी दिल्लीः महात्मा गांधी यांच्यावर जेव्हा पहिला चित्रपट बनला, तेव्हा जगभरात गांधींबाबत कुतुहल निर्माण झाले. त्यापूर्वी त्यांना कोणीही ओळखत नव्हते, असे विधान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले आहे. मोदी यांच्या या वक्तव्यामुळे देशातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे आहेत.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एबीपी न्यूजला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. महात्मा गांधी हे एक मोठे व्यक्तिमत्व होते. आपण जगभर त्यांची ओळख निर्माण करायला हवी होती. ही आपली जबाबदारी होती. मात्र आपण त्यात अपयशी ठरलो. त्यांना कोणीही ओळखत नव्हते, असे मोदी म्हणाले.
ज्यावेळी महात्मा गांधींवर पहिल्यांदा चित्रपट बनला तेव्हा जगभरात गांधी कोण आहे? याबाबत कुतुहल निर्माण झाले. त्यांची ओळख निर्माण करण्यासाठी आपण ७५ वर्षांत काहीही केले नाही, असेही नरेंद्र मोदी यांनी या मुलाखतीत म्हटले आहे.
जगभरात मार्टीन ल्यूथर किंग आणि नेल्सन मंडेला यांना ओळखले जाते. गांधी त्यांच्यापेक्षा कमी नव्हते. मी संपूर्ण जग फिरलो आहे. मात्र गांधी किंवा गांधींच्या माध्यमातून भारताला जी ओळख मिळायला हवी होती, ती मिळाली नाही. जगभरातील अनेक समस्यांचे समाधान गांधींच्या विचारात आहे. आपण खूप काही गमावले आहे, असेही मोदी म्हणाले.
मी मुस्लिम समाजात शिकलो- वाढलो आहे. माझ्या घराच्या आजूबाजूला पसमांदा समाजाचे लोक राहतात. माझा जन्मही याच वस्तीत झाला आहे. त्या सर्व लोकांच्या हातात खूप चांगला हुनर आहे, आपण त्यांना बळ दिले तर त्यामुळे देशाचे भले होईल. परंतु काही लोक त्यांना चुकीच्या मार्गावर घेऊन चालले आहेत. त्यामुळे परेशानी वाढते, असेही मोदी म्हणाले.
मोदींचे संतुलन बिघडले😌