नांदेडचे बिल्डर बियाणींच्या हत्येप्रकरणी पकडलेला शूटर रंगाचे पाक, कॅनडातील अतिरेक्यांशी संबंध; वाचा त्याची संपूर्ण कहाणी


झज्जर(हरियाणा):   नांदेडचे बिल्डर संजय बियाणी यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एनआयएने अटक केलेला खतरनाक शार्पशूटर दीपक रंगा यांचे कॅनडा आणि पाकिस्तानातील अतिरेकी आणि गँगस्टर्सशी संबंध आहेत. त्याला तेथून रसद पुरवली जाते. दीपक रंगा हा एनआयएच्या यादीतील मोस्ट वॉँन्टेड आरोपींपैकी एक असून मोहालीतील पंजाबच्या इंटेलिजन्स ऑफिसवरील ग्रेनेड हल्ला प्रकरण, संजय बियाणी हत्याप्रकरणासह अन्य गुन्ह्यासाठी त्याला एनआयएनने अटक केली आहे. मोबाईल चोरापासून सुरू झालेला दीपक रंगाचा गुन्हेगारी जगतातील प्रवास खतरनाक वळणावर येऊन ठेपला आहे.

दीपक रंगा हा हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील सुर्खपूर गावचा रहिवाशी आहे. वयाच्या १८ व्या वर्षी झज्जर बायपासवर मोबाईल हिसकावून घेतल्याप्रकरणी दीपक रंगावर पहिला गुन्हा दाखल झाला होता. २०१८ मध्ये त्याने आपल्या तीन साथीदारांसह एका व्यक्तीच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला होता. २ नोव्हेंबर २०१८ रोजी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचाः नांदेडचे बिल्डर बियाणींच्या हत्याप्रकरणात शार्टशूटर रांगाला एनआयएकडून अटक, हत्याकटाचे धागेदोरे उलगडणार?

इयत्ता बारावीपर्यंत शिकलेला दीपक रंगा शाळेत असतानाच छोटे-मोठे भांडणं करायचा. मोबाईल हिसकवाल्याचा आरोपात त्याला अटक झाल्यानंतर न्यायालयाने त्याची रवानगी जिल्हा मध्यवर्ती तुरूंगात केली होती. दीपकच्या  काकांनी त्याची जमानत घेतली होती. न्यायालयात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर दोनच तारखांना दीपक रंगा हजर राहिला. त्यानंतर त्याने न्यायालयाची पायरी चढली नाही. तो फरारच राहिला. त्यामुळे दीपक रंगाचा जामीन घेणारे त्याचे काका नरेश यांना न्यायालयाने दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला होता.

विद्यमान परिस्थितीत सुर्खपूर गावात १८ यार्डाच्या घरात दीपक रंगाची आई, छोटी बहीण आणि छोटा भाऊ राहतो. २०१८ नंतर दीपक रंगाने आपले गाव आणि घराचे तोंड पाहिले नाही. १५ डिसेंबर २०२१ रोजी न्यायालयाने त्याला फरार घोषित केले. रोहतकच्या सांपला पोलिस ठाण्यातही सप्टेंबर २०१९ मध्ये त्याच्याविरोधात लूटमारीचे दोन गुन्हे दाखल झाले होते. दीपक रंगाच्या शोधात पोलिस घरी आले नाहीत, असा एकही दिवस जात नाही, असे त्याचे कुटुंबीय सांगतात.

बुधवारी दीपक रंगाला एनआयएने नेपाळ सीमेवरून अटक केली. त्याच्या अटकेची खबर त्याचे गाव सुर्खपुरात पोहोचली. सदीपक रंगाच्या कुटुंबीयांना त्याच्या अटकेची खबर लागल्यानंतर त्याची आई तिच्या माहेरी खरखौदाला गेली. दीपक रंगाच्या विरोधात एक जानेवारी रोजी अंबालामध्ये एका व्यक्तीचा खून केल्याचा गुन्हाही दाखल झाला आहे, असे पोलिसांनी सांगितले.

मागील वर्षी पंजाब पोलिसांच्या इंटेलिजन्स मुख्यालयावर ग्रेनेड हल्ल्याचा मुख्य आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आल्याची माहिती बुधवारी एनआयएने दिली. मे २०२२ मध्ये हा हल्ला झाला होता. हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या दीपक रंगाला बुधवारी सकाळी गोरखपूर येथून अटक करण्यात आल्याचे एनआयएच्या प्रवक्त्याने सांगितले. पंजाब पोलिस मुख्यालयावरील ग्रेनेड हल्ल्याबरोबरच दीपक रंगा अनेक गुन्ह्यात एनआयला वॉन्टेड होता.

कॅनडा, पाकिस्तानातील दहशतवाद्यांशी जवळीकः रॉकेटद्वारे डागलेल्या ग्रेनेड हल्ल्यानंतर दीपक रंगा फरार झाला होता. दीपक रंगा हा कॅनडास्थित गँगस्टरचा दहशतवादी बनलेला लखबीरसिंग संधू उर्फ लांडा आणि पाकिस्तानस्थित गँगस्टरचा दहशतवादी बनलेला हरविंदसिंग संधू उर्फ रिंदाचा अत्यंत विश्वासू होता. पोलिस मुख्यालयावरील हल्ल्याबरोबरच दीपक रंगाचा खूनासह अन्य दहशतवादी आणि गुन्हेगारी कारयावात सहभाग आहे. दीपक रंगाला लांडा आणि रिंदाकडून मोठ्या प्रमाणात पैसा आणि शसत्रे, दारूगोळा आदी सहकार्य मिळत राहिले आहे, असे एनआयएच्या सूत्रांनी सांगितले.

परदेशातून ऑपरेटिंगः परदेशात बसलेल्या दहशतवादी संघटना आणि संघटित गुन्हेगारीचे म्होरके उत्तर भारतात दहशतवादी कारवाया करत असल्याची गुप्त माहिती हाती लागल्यानंतर एनआयने स्वतःहून दखल घेत २० सप्टेंबर रोजी एफआयआर दाखल केला. गँगस्टर्स आणि स्मगलर्सचे नेटवर्क सीमेपलीकडून शस्त्रे आणि स्फोटकांसह अन्य घातक सामग्रीची तस्करी करत असल्याचे एनआयएच्या तपासात उघड झाले आहे. या प्रकरणात या नेटवर्कच्या १९ लोकांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे, असे एनआयएच्या प्रवक्त्याने सांगितले.

दीपक रंगा त्या नेटवर्कचाच भागः गृह मंत्रालयाने कॅनडास्थित दल्लाला ९ जानेवारीला अतिरेकी घोषित केले आहे. दहशतवादी, गँगस्टर आणि स्मगलर्सचे नेटवर्क नेस्तनाबूत करण्यासाठी एनआयए कारवाई करत आहे, असे एनआयएचा प्रवक्ता म्हणाला. दीपक रंगा हा याच दहशतवादी, गँगस्टर आणि स्मगलर्सच्या नेटवर्कचा एक भाग आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!